चिन्मयानंद यांचा जामीन अर्ज फेटाळला

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

चिन्मयानंद यांना शुक्रवारी अटक  करण्यात आली असून नंतर चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. त्यांना सोमवारी लखनौ रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुन्हा सिद्ध झाल्यास चिन्मयानंद यांना जन्मठेपेची शिक्षा होऊ शक ते पण त्यांच्यावर बलात्काराचा आरोप ठेवला नसून अधिकार पदावरील एखाद्या व्यक्तीने महिलेशी शारीरिक संबंध ठेवणे म्हणजे कलम ३७६ सी लावण्यात आले आहे त्यात पाच ते १० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

विशेष तपास पथकाने मंगळवारी सचिन व विक्रम या दोघांना ९५ तासांसाठी ताब्यात घेतले आहे.  खंडणी मागणारा कॉल करण्यासाठी वापरलेला मोबाइल फोन शोधण्यासाठी दोघांना घटनास्थळी नेऊन तपास करण्यात येणार आहे. आरोपींनी तपास पथकाला सांगितले की,‘ खंडणीसाठी कॉल करण्यासाठी वापरलेला मोबाइल फोन त्यांनी मेहंदीपूर बालाजी या राजस्थानातील ठिकाणी फेकून दिला.’ तो मोबाइल मिळवण्यासाठी आता त्यांना तिकडे नेले जाणार आहे. ज्या तरुणीने चिन्मयानंद यांच्यावर बलात्काराचे आरोप केले आहेत ती त्यांच्याच विधी महाविद्यालयात शिकत होती.

विधी महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात भाजप नेते व माजी केंद्रीय मंत्री  स्वामी चिन्मयानंद यांना उत्तर प्रदेशातील न्यायालयाने जामीन नाकारला आहे.

शहाजहानपूरच्या मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी चिन्मयानंद यांचा जामीन अर्ज सोमवारी फेटाळला. याबाबत सत्र न्यायालयात अर्ज करावा असे न्यायालयाने सांगितल्याचे चिन्मयानंद यांचे वकील ओम सिंह यांनी म्हटले आहे. दरम्यान खंडणीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या संजय, सचिन, विक्रम या तिघांना याच कारणास्तव जामीन नाकारण्यात आला. या प्रकरणातील तरुणीसह या तिघांवर चिन्मयानंद यांनी खंडणीचा आरोप केला आहे.

Web Title: Chinmayanands Bail Application Was Rejected 

संबंधित बातम्या

Saam TV Live