चिराग पासवान यांना लोक जनशक्ती पार्टीच्या अध्यक्षपदावरून हटवले

Saam Banner Template
Saam Banner Template

नवी दिल्ली: चिराग पासवान (Chirag Paswan) यांना लोक जनशक्ती पार्टीच्या राष्ट्रीय (LPJ) अध्यक्षपदावरून हटविण्यात आले आहे. त्यांच्या जागी सूरज भान यांना कार्यकारी अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली असून सूरज भान हे पक्षाच्या नवीन अध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पाडतील. वृत्तानुसार, एक व्यक्ती एक पद या नियमानुसार चिराग यांना हटवण्यात आले आहे. पाच दिवसांतच राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली जाईल आणि नवीन अध्यक्षांची निवडणूक घेण्यात येईल. यापूर्वी लोक जनशक्ती पार्टीने चिराग पासवान यांना पक्षाच्या संसदीय नेत्याच्या पदावरूनही काढून टाकले होते. (Chirag Paswan was removed from the post of Lok Janshakti Party president)

एलजेपीचे 6 खासदार होते, त्यातील 5 जणांनी बंडखोरी केली होती. त्यासाठी लोकसभा सभापतींना विनंती केली होती ती मान्य देखील झाली होती. चिराग पासवान यांचे काका पशुपती कुमार पारस हे लोक जनशक्ती पार्टीचे संसदीय पक्षाचे नवे नेते म्हणून निवडले गेले. चिराग यांना राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून हटविल्यामुळे काका आणि पुतण्या यांच्यात सलोखा करण्याच्या शक्यता विखुरलेल्या दिसत आहेत. असे मानले जाते की 20 जूनपूर्वी पशुपती कुमार पारस लोक जनशक्ती पक्षाचे नवे अध्यक्ष म्हणून निवडले जातील.

हे देखील पाहा

पशुपति पारस हे दिवंगत नेते रामविलास पासवान यांचे छोटे भाऊ आहेत. लोकसभेत लोक जनशक्ती पक्षाचे नेते झाल्याने त्यांनी आपला पक्ष मजबूत करण्याचे संकेत दिले होते. सभापती ओम बिर्ला यांनीही त्यांना पक्षाचे संसदीय नेते म्हणून मान्यता दिली आहे. लोक जनशक्ती पार्टीच्या पाच खासदारांनी मेहबूब अली कैसर यांना उपनेतेपदी निवडले आहे.

चंदन सिंग यांना पक्षाचे मुख्य व्हीप बनविण्यात आले आहे. लोकशक्ती पक्षात खासदार चिराग पासवान यांच्या विरोधात बंडखोर वृत्ती दाखविणाऱ्या खासदारांमध्ये पशुपती पारस व्यतिरिक्त चंदन सिंह, प्रिन्स राज, वीणा देवी आणि मेहबूब अली कैसर हे आहेत. असं मानलं जातं की मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात पशुपती पारस किंवा लोक जनशक्ती पार्टीच्या अन्य नेत्यालाही स्थान मिळू शकते. असे मानले जात होते की चिराग पासवान जेव्हा एलजेपीचे अध्यक्ष होते तेव्हा नितीशकुमारांचा पक्ष जेडीयू आणि एलजेपीला एनडीएमध्ये एकत्र येणे कठीण होते. 

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com