चित्रा वाघ यांच्या पतीची बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी चौकशी होणार ?

साम टीव्ही
शनिवार, 27 फेब्रुवारी 2021

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीवर ACB ने गुन्हा दाखल केलाय. संजय राठोड यांच्यावर कारवाईची मागणी लावून धरल्यानेच सूडबुद्धीने कारवाई केल्याचा भाजपचा आरोप आहे.

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीवर ACB ने गुन्हा दाखल केलाय. संजय राठोड यांच्यावर कारवाईची मागणी लावून धरल्यानेच सूडबुद्धीने कारवाई केल्याचा भाजपचा आरोप आहे.

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड यांच्याविरोधात आक्रमक झालेल्या भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्या समोरच्या अडचणी वाढण्याची चिन्हं आहेत. कारण बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात एसीबीकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

सरकारी नोकर असलेल्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांना 2016 मध्ये लाचखोरी प्रकरणी अटक करण्यात आली होती. किशोर वाघ यांच्या विविध शहरात असलेल्या मालमत्तांपैकी 90 टक्के मालमत्ता ही बेहिशेबी असल्याचा आरोप आहे. ही मालमत्ता एक कोटींहून अधिक असल्याचा दावा केला जातोय. या प्रकरणी आता नव्याने तक्रार दाखल झाल्याने ACB ने परत गुन्हा दाखल केलाय. 

दरम्यान, या कारवाईवरून भाजपाने महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केलीय. चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतल्याने राजकीय सुडबुद्धीने कारवाई केल्याचा भाजपचा आरोप आहे.

एकूणच काय तर पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणावरून सुरू झालेला सरकार विरूद्ध विरोधक हा संघर्ष आता वेगळ्या टप्प्यावर येऊन ठेपलाय. 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live