नियमांची पायमल्ली करत चोंभाबाई माता देवीची प्राणप्रतिष्ठा व कलश पूजन सोहळा संपन्न 

रोहिदास गाडगे
गुरुवार, 29 एप्रिल 2021

नियमांची पायमल्ली करत कुरवंडी येथे चोंभाबाई माता मंदिरात प्रतिष्ठापना करत कलष पुजनाचा सोहळा करण्यात आला आहे. कुरवंडी गावात यापूर्वीचा कोरोनाने शिरकाव केला असतानाही कोरोनाचे गांभिर्य न ठेवता गर्दी करत देवीच्या मुर्तीची प्रतिष्ठापनेचा सोहळा संपन्न झाला.

आंबेगाव -  कोरोनाच्या Corona पार्श्वभुमीवर राज्यात कडक लॉकडाऊनची Lockdown अंमलबजावणी सुरु असताना गावागावातील जत्रा यात्रा देवदेवतांचे उत्सव रद्द करण्यात आले असतानाही आंबेगाव Ambegaon तालुक्यातील कुरवंडी येथे चोंभाबाई माता देवीची Mata Devi प्राणप्रतिष्ठा व कलश पुजना सोहळा करण्यात आला. In Chombhabai Mata Devi mandir Kalash Pujan ceremony was held

यावेळी गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा सोहळा साजरा केला. या सोहळ्याकडे स्थानिक प्रशासनाकडुन दुर्लक्ष करण्यात आले आहे. या सोहळ्यातून  समूह संसर्ग वाढल्यास जबाबदार कोन ? असाही प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे

पुण्याच्या ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असताना कोरोनाची समूह संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडुन कडक नियमावली लागु करण्यात आली आहे. मात्र जिल्हा प्रशासनाकडून लागु करण्यात आलेल्या नियमांची पायमल्ली करत कुरवंडी येथे चोंभाबाई माता मंदिरात प्रतिष्ठापना करत कलष पुजनाचा सोहळा करण्यात आला आहे. कुरवंडी गावात यापूर्वीचा कोरोनाने शिरकाव केला असतानाही कोरोनाचे गांभिर्य न ठेवता गर्दी करत देवीच्या मुर्तीची प्रतिष्ठापनेचा सोहळा संपन्न झाला.

Edited By - Shivani Tichkule

 

 

 

संबंधित बातम्या

Saam TV Live