कोरोनावर मात करत 75 वर्षीय डोंबिवलीकर आजींनी पुन्हा सुरु केली श्वान सेवा
street dog

कोरोनावर मात करत 75 वर्षीय डोंबिवलीकर आजींनी पुन्हा सुरु केली श्वान सेवा

डोंबिवली : कोरोनाने Corona जगाच्या पाठीवर थैमान घातले असल्याने या महामारीला घाबरून अनेक माणसे मृत पावत आहे. मात्र कोरोनावर मात करत 75 वर्षीय डोंबिवलीकर आजींनी आपली श्वान सेवा Dog  पुन्हा सुरु केली आहे. 75 year old Dombivalikar Aji serving food to street dogs

पुन्हा एकदा कडक निर्बंध लादल्याने माणसानी घराबाहेर भटकणाऱ्या प्राण्यांना खाद्य टाकणे बंद केले आहे. परिणामी भटक्या प्राण्यांच्या उदरभरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत डोंबिवलीच्या 75 वर्षीय आजीबाई रस्त्यावर उपाशीपोटी भटकणाऱ्या श्वानांची सेवा करत आहेत.  

अंजली एकबोटे Anjali Ekbote या डोंबिवली Dombavali पूर्वेकडील पेंडसे नगर मध्ये राहतात. शहरातील विविध भागात फिरून त्या भटक्या कुत्र्यांना Street Dog जेवण देत असतात. एका पिशवीत प्लास्टिक डबा आणि भांडे घेऊन फिरणाऱ्या या आजी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या आवारात संध्याकाळी नित्यनेमाने येतात. आजी आल्याचे समजताच इकडे तिकडे विखुरलेली कुत्री शेपूट हलवत तात्काळ आजी जवळ येतात. कुठेतरी आडोसा पाहून या आजी सोबत आणलेल्या पिशवीतील डब्यातील दूध-भात कुस्करून सगळ्या कुत्र्यांना खाऊ घालतात. आजींमुळे या कुत्र्यांना जणू संजीवनी मिळाली आहे. 75 year old Dombivalikar Aji serving food to street dogs

ही कुत्री बरोबर ठराविक वेळेत आजींची वाट पाहत असतात. खाऊ संपला की घरी जाण्यासाठी निघालेल्या आजींना निरोप देण्यासाठी सगळी कुत्री प्रवेशद्वारापर्यंत जातात. हे सगळे दृश्य पाहण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी, सुरक्षारक्षकच नव्हे तर अधिकारीही थांबलेले असतात. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या दिवसात रस्त्यावर शुकशुकाट आणि त्यात हॉटेल्स बंद असल्यामुळे नेहरू मैदान, घरडा सर्कल, एमआयडीसीतील निवासी विभाग परिसरात भटक्या कुत्र्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला होता.

या आजींनी मागचा-पुढचा विचार न करता त्या भागात जाऊन मरणासन्न कुत्र्यांना खाऊ घातले. मात्र त्यांना महिनाभरापूर्वी कोरोना झाला. मात्र त्यांनी स्वतःला गृह विलगिकरण केले आणि डॉक्टरांचा सल्ला घेत उपचार केले.अखेर 20 दिवसांनी त्यांनी कोरोनावर मात केली आणि पुन्हा एकदा श्वान सेवेत रूजू झाल्या. आजींमुळे या कुत्र्यांना जणू संजीवनी मिळाली आहे. ही कुत्री बरोबर ठराविक वेळेत आजींची वाट पाहत असतात.  75 year old Dombivalikar Aji serving food to street dogs

कोरोनावर निश्चितच मात करता येते. कोरोना झाला तरी घाबरून जाऊ नका. गर्दी मध्ये जाणे टाळा आणि जेवढे जमले तेवढा आराम करा. वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या अशी विनंती अंजली एकबोटे यांनी केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com