वऱ्हाड्यांच्या टेम्पोचा अपघात; १ ठार तर ३१ वऱ्हाडी जखमी

वऱ्हाड्यांच्या  टेम्पोचा अपघात; १ ठार तर ३१ वऱ्हाडी जखमी
Accident of bridal tempo in Nanded

नांदेड : नांदेड Nanded जिल्ह्य़ात वऱ्हाडाच्या टेम्पो उलटून अपघात झाला आहे. या अपघातात एक जण ठार तर ३१ वऱ्हाडी जखमी झालेत. आज सकाळी मुखेड Mukhed तालुक्यातील खरबखंड गाव जवळ हा अपघात झाला आहे. Accident of bridal tempo in Nanded

जखमींना उपचारासाठी नांदेड च्या जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. लातूर जिल्ह्यातील हाळी येथील लग्नाचा वऱ्हाड टेम्पोने नांदेड जिल्ह्यातील बिलोली कार्ला येथे जात होता. या दरम्यान चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. 

हे देखील पहा - 

या अपघातामुळे वाहतूक खोळंबली होती. स्थानिक नागरिकांनी मदत केल्याने जखमींना उपचार मिळाले. जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर असल्याचे नातेवाईकांनी सांगितले..
Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com