कोर्लईचा लाॅकडाऊन कुणाला रोखण्यासाठी? सोमय्यांचा सवाल

कोर्लईचा लाॅकडाऊन कुणाला रोखण्यासाठी? सोमय्यांचा सवाल
Kirit Somaiya

अलिबाग : कोर्लई Korlai गावात घराच्या बाहेर पडण्यासाठी तसेच गावात अन्य कोणी येण्यासंबंधात प्रतिबंध लादला गेला आहे व गावचा शेवटचा कोरोना रुग्ण बरा होऊन नंतर २८  दिवस पर्यंत हा लॉकडाऊन Lock Down, गाव बंदी राहिल असा आदेश अलिबाग प्रशासनाने 3 जूनला काढला आहे. त्यावर किरिट सोमय्या यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. Bjp Leader Kirit Somaiya Quiestions Korlai Lock Down

१ जूनला किरीट सोमय्या Kirit Somaiya यांनी आपण कोर्लई ग्रामपंचायत, तहसीलदार आदी अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे Uddhav Thackeray , रविंद्र वायकर परिवाराच्या १९ बंगल्यांच्या घोटाळ्याचा पाठपुरावा करण्यासाठी येणार असे कळविले होते. त्याच उत्तरात म्हणून किरीट सोमय्या यांना  जून रोजी गावबंदी, घरबंदी चा हा आदेश पाठविला.

हे देखिल पहा

अशा प्रकाराने गावातला एक माणूसपण कोरोनाग्रस्त असेल किंवा शंभर टक्के गाव कोरोना मुक्त होऊन 28 दिवस उलटणार नाहीत तो पर्यंत 100% लॉकडाऊन लागू करण्याचा अधिकार कोणत्या कायद्यांतर्गत आहे? असा प्रश्न सोमय्या यांनी विचारला आहे. Bjp Leader Kirit Somaiya Quiestions Korlai Lock Down

अशा प्रकारची घर, गाव बंदी हे घटनेच्या दृष्टीने गैरकायदेशीर आहे. अशा प्रकारचा आदेश रायगड सोडा महाराष्ट्रात, देशात कुठे लागू करण्यात आला आहे असे किरीट सोमय्या यांनी सांगितले. वायकर परिवाराच्या 19 बंगल्यांच्या घोटाळ्या संबंधात मी येत आहे म्हणून असा आदेश प्रशासनाने काढला, असे मला म्हणायचे नाही. परंतु गावकऱ्यांवर अशा प्रकारचा अत्याचार, सत्येचा राक्षसी उपयोग कोणत्या कायद्याखाली केला, अशा प्रश्न किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारला केला आहे. Bjp Leader Kirit Somaiya Quiestions Korlai Lock Down

कोरोना उपचार याला प्राधान्य देणं ही आमचीही जबाबदारी आहे, परंतु सत्तेचा राक्षसी दुरुपयोग याचा पुनर्विचार व्हावा. लोकडाऊन ७-७ दिवसाचे असतात, असे अनिश्चित लॉकडाऊन फक्त कोर्लाई साठी??? असे ही ते म्हणाले. आज किरीट सोमय्या हे आज मुरुड तहसीलदार आणि सी ई ओ रायगड यांची कोरोना आणि १९ बंगल्यांच्या घोटाळा प्रकरणी भेट घेणार आहेत.

Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com