उल्हासनगर मधील कोविड संशयित रुग्णांना मध्यवर्ती रुग्णालय बनलं आधार...

उल्हासनगर मधील कोविड संशयित रुग्णांना मध्यवर्ती रुग्णालय बनलं आधार...
uhlasnagar

उल्हासनगर : उल्हासनगर मध्ये कोविड Covid संशयित रुग्णांना मध्यवर्ती रुग्णालय आधार बनलं असून ,ज्या रुग्णांची टेस्ट झाली नाही आणि ज्या रुग्णांना अचानक त्रास सुरू झाला आहे. अश्या रुग्णांना कोणतंच कोविड रुग्णालय दाखल करून घेत नसताना, उल्हासनगर मधील शासकीय मध्यवर्ती रुग्णालय अश्या रुग्णांना दाखल करून घेत आहे. The central hospital in Ulhasnagar became the base for Covid patients

उल्हासनगरचे Ulhasnagar  शासकीय मध्यवर्ती रुग्णालय, हे रुग्णालय सामान्य रुग्णालय असून, या रुग्णालयात कोविड रुग्ण ठेवले जात नाहीत. मात्र हे रुग्णालय आता सर्व सामान्य कोविडच्या संशयित रुग्णांसाठी आधार ठरत आहे. सर्व सामान्य व्यक्तीस आता कोणता आजार किंवा कोरोनाची लक्षणं दिसली की एक धसकी भरते, त्यानंतर काही लोकांना ऑक्सिजन Oxygen लेव्हलची गरज पडते, तेव्हा नातेवाईक रुग्णालय शोधू लागतात.

मात्र या रुग्णांना कोणतंच कोविड  रुग्णालय किंवा खाजगी रुग्णालय दाखल करून घेत नाही. कारण त्याची कोरोना चाचणी झालेली नसते.अँटिजेंन Antigen टेस्ट केल्यानंतर ती टेस्ट पॉसिटीव्ह Positive आल्यास, आपण चिंतेत पडतो आणि कोणत्या रुग्णालयात घेऊन जायचे, कोणत्या रुग्णालयात बेड शिल्लक आहे का ? ते आपल्या उपलब्द होईल की नाही, मग करायचं काय ? असे अनेक प्रश्न उपस्थित झाल्यावर पेशंटला घरी जाण्याशिवाय पर्याय नसतो. The central hospital in Ulhasnagar became the base for Covid patients

अश्यावेळी उल्हासनगर मधील कोविड संशयित रुग्णांना मध्यवर्ती रुग्णालय एक आधार झाला आहे. कोणत्याही प्रकारचा रुग्ण असू त्याला दाखल करून नंतर अँटिजेंन आणि RTPCR आरटीपीसिआर चाचणी करून घेतात आणि रिपोर्ट येईपर्यंत सदर रुग्णनांवर उपचार केले जात आहे. या रुग्णालयात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर Ventilator असल्याने रुग्णाला लगेच उपचार मिळाल्याने ते दगावत नाही. हे रुग्णालय सर्वसामान्यासाठी कोरोना काळात महत्वाचा आधार झाला असल्याची प्रतिक्रिया रुग्णाचे नातेवाईक देत आहेत.

कठीण परिस्थितीत जो आपल्यासाठी धावून येतो. तो देव असल्याचं आपण मानतो, तसंच कुठेही बेड उपलब्द नसताना, देखील उल्हासनगरचे मध्यवर्ती रुग्णालय देवासारखे उभे आहे. हे रुग्णालय सर्व सामन्यानसाठी आधार ठरत आहे. संशयित रुगणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, की आम्ही त्यां रुग्णांना कोविड  रुग्णालयात दाखल करतो असे रुग्णालयाचे अधीक्षक सुधाकर शिंदे सांगितले आहेत.

Edited by- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com