बहुप्रतिक्षित महापालिकेच्या शहर बस वाहतूक सेवेचा मुहूर्त ठरला 

बहुप्रतिक्षित महापालिकेच्या शहर बस वाहतूक सेवेचा मुहूर्त ठरला 
bus nashik

नाशिक - नाशिकच्या Nashik बहुप्रतिक्षित महापालिकेच्या शहर बस Bus वाहतूक सेवेला आता 1 जुलैचा मुहूर्त सापडला आहे. वर्षाकाठी 35 कोटी रुपयांचा तोटा असलेली ही बस सेवा सुरुवातीपासूनच वादात असली, तरी देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis यांचा ड्रीम प्रोजेक्ट Dream Project असल्याने सत्ताधारी भाजपने BJP बस सेवा रेटून नेण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे सुरुवातीला विरोध करणारे सर्वपक्षीय नगरसेवक आता मात्र गप्प असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.  The city bus service will start soon

नाशिक महापालिकेच्या परिवहन विभागाने येत्या 1 जुलैपासून शहरात बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या या बस सेवेला या निमित्ताने आता नवीन मुहूर्त सापडला आहे. येत्या 27 तारखेपासून या बससेवेची ट्रायल घेण्यात येणार असून सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात 50 बसेस चालवल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे शहरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी धार्मिक पर्यटनासह सुला वाईन्स आणि धरणावरील बोटींग क्लबसाठी स्वतंत्र बससेवा सुरू करण्यात येणार आहे. 

देवेंद्र फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या बसेवेरून सुरुवातीला बरेच गोंधळ आणि वाद निर्माण झाले. त्यामुळे अगदी बस सेवा सुरू होण्याआधीपासूनच ही बससेवा वादात सापडली होती. मात्र आता आगामी महापालिका निवडणुकांपूर्वी भाजपने बससेवेचा प्रकल्प यशस्वीपणे चालवून दाखवण्याची तयारी सुरू केली आहे. फायदा आणि तोट्याच्या पलीकडे जाऊन नागरिकांच्या सोयीचा विचार करून या बस सेवेकडे बघावं असं महापौर सतीश कुलकर्णी यांचं म्हणणं आहे.  The city bus service will start soon

हे देखील पहा -

याआधी एसटी महामंडळाकडून चालवण्यात येत असलेली शहर बस वाहतूक सेवा तोट्यात असल्याचं कारण देत ती चालवण्यास एसटीनं असमर्थता दर्शवली. त्यानंतर कोणत्याही शहराच्या दृष्टीने सार्वजनिक वाहतूक अत्यंत महत्वाची असल्याचं सांगत या बससेवेचं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी समर्थन केलं होतं. मात्र सार्वजनिक वाहतूक सेवा नाशिककरांसाठी महत्वाची आहे, हे जरी खरं असलं, तरी यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर पडणारा बोजा हा पर्यायाने नागरिकांवर पडणार असल्याने याचा देखील विचार होण्याची आवश्यकता आहे. 

Edited By - Shivani Tichkule
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com