कोरोना वाढला, मुंबई लोकलचं काय? कोरोनाच्या ट्रॅकमुळे लोकलला कोणता सिग्नल?

कोरोना वाढला, मुंबई लोकलचं काय? कोरोनाच्या ट्रॅकमुळे लोकलला कोणता सिग्नल?

मुंबई लोकलमध्ये आता सर्वसामान्यांना प्रवेश मिळालाय.पण आता मुंबईत कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागलेयत.त्यामुळे मुंबई लोकलबाबत काय निर्णय होणार? असा प्रश्न मुंबईकरांना पडलाय.

कोरोना पुन्हा आलाय.त्याने पुन्हा मुंबईसह महाराष्ट्राला विळख्यात घेतलंय. या गोष्टी या प्रवाशांच्या गावी नाहीयत. जणू कोरोना कायमचा गेलाय, अशाच थाटात मुंबईकर मुंबई लोकलवर तुटून पडतायत.कोरोनाचे रूग्ण पुन्हा वाढू लागल्यामुळे मुंबईच्या लोकलबाबत नेमका काय निर्णय होणार याबाबत संभ्रम असतानाच, लोकल बंद होणार असल्याचे मेसेज व्हायरल झाले, मात्र लोकलबाबत राज्याने निर्णय घेण्याचे निर्देश केंद्रीय रेल्वेनं दिलेयत. त्यामुळे राज्य आणि केंद्र लोकलबाबतच्या निर्णयाचा चेंडू टोलवताना दिसतायत. मात्र तरीही लोकल सुरू ठेवावी की बंद याबाबत आम्ही मुंबईकरांची मतं जाणून घेतली.

लोकलमधली गर्दी पाहता, मागच्या वेळी मुंबईची लोकल बंद ठेवण्यात आली होती. कधी नव्हे ती लोकल कित्येक महिने बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता ती पुन्हा सुरू करण्यात आलीय. कोरोनाचे रूग्ण मुंबईतही वाढू लागलेयत. त्यामुळे, लोकांच्या आरोग्याची काळजी घेत लोकलबाबत योग्य तो निर्णय तातडीने घेण्याची गरजय. त्याचसोबत, मुंबईकरांनी लोकलचा प्रवास करताना संयम, शिस्त आणि कोरोनाचे नियम पाळायला हवेत. नाहीतर आपल्याला हवं तिथं नेणारी मुंबईकरांची लाडकी लोकल आपल्याला कोरोनाच्या स्टेशनवर उतरवेल, हे विसरता कामा नये.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com