धक्कादायक २२ तास मृतदेह कोरोना ग्रस्त रुग्णा शेजारीच..(पहा व्हिडिओ)

धक्कादायक २२ तास मृतदेह कोरोना ग्रस्त रुग्णा शेजारीच..(पहा व्हिडिओ)

बीड : बीडच्या Beed जिल्हा रुग्णालयातून पुन्हा एकदा एक धक्कादायक बाब समोर आली आहे. गुरुवारी रात्री नऊ वाजता मृत्यू पावलेल्या व्यक्तीचा मृतदेह कोविड वॉर्ड Covid Ward मध्येच तसाच गुंडाळून ठेवण्यात आला होता. जवळपास वीस तास हा मृतदेह इथेच ठेवला असल्याचे या ठिकाणच्या रुग्णांनी सांगितले. Dead Body Kept near Covid Patients for Twenty Hours in Beed

जिल्हा रुग्णालयातील नर्सिंग हॉस्टेल मधील कोविड वार्डमधील हा सर्व प्रकार आहे. हा मृतदेह याठिकाणी ठेवण्यात आल्याने वार्डमधील रुग्ण देखील भयभीत झाले होते. तब्बल वीस तासानंतर हा मृतदेह जिल्हा रुग्णालय प्रशासनाने बाहेर काढला. याबाबत रुग्णालय प्रशासनाशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही, मात्र हा सर्व प्रकार समोर आल्याने आता संताप व्यक्त केला जातोय.

दरम्यान,  बीडमध्ये Beed बनावट रेमडेसिविर Remdisivir इंजेक्शनचा प्रकार कालच उघडकीस आला असतांना, आता बोगस एचआरसीटी स्कोअर देत असल्याचा प्रकार देखील समोर आलाय.हा सर्व प्रकार वंचित बहुजन आघाडीचे Vanchit Bahujan Aghadi जिल्हाध्यक्ष शिवराज बांगर यांनी समोर आणला असून याविषयीची तक्रार त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलीय. Dead Body Kept near Covid Patients for Twenty Hours in Beed

जिल्हाधिकाऱ्यांना District Collector दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की डोंगरे नामक महिला या कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या.त्यांचा जिल्हा रुग्णालयात एचआरसीटी स्कोअर तपासला असता ३ स्कोअर दिला होता.त्यांचा शहरातील शिवाजीराव हार्टकेअर सेन्टरमध्ये एक्सरे काढला असता नॉर्मल आला.पुन्हा त्याच शहरातील unique advance सिटी सेन्टरमध्ये एचआरसीटी  HRCT स्कोअर तपासणी केली असता १० स्कोअर दिला.हा सर्व प्रकार केवळ १ ते २ तासात झालाय, असेही या तक्रारीत नमूद करण्यात आलंय
Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com