प्रवाशांचे मोबाईल लंपास करणाऱ्या चोरट्याला गोंदिया रेल्वे पोलिसांकडून अटक

प्रवाशांचे मोबाईल लंपास करणाऱ्या चोरट्याला गोंदिया रेल्वे पोलिसांकडून अटक
gondia

गोंदिया - रेल्वेने Railway प्रवास  करणाऱ्या प्रवाशांचे Passengers मोबाईल Mobile लंपास करणाऱ्या चोरट्याला Thieve गोंदिया रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. किशोर साळके (वय 20 वर्ष रा.कुडवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.  Gondia Railway Police arrested a thief for stealing a passenger's mobile phone

ओडीसातल्या राऊलकेला येथील सुभाष वर्मा हा तरुण 11 मार्च रोजी मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेसने प्रवास करत होता. गोंदिया रेल्वे स्थानकावर गाडी थांबवली असताना एका चोरट्याने त्याच्या खिशातून मोबाईल लंपास करत पळ काढला.

या प्रकरणाची तक्रार सुभाष वर्मा यांनी गोंदिया Gondia रेल्वे पोलिसांकडे Police केली होती. तक्रार मिळाल्यानंतर पोलीस सायबर सेलच्या Cyber Cell मदतीने या चोराचा शोध घेत होते. तपास सुरू असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे यांनी कुडवा येथील किशोर साळके याला ताब्यात घेतले.

हे देखील पहा -

त्याच्याकडून संबंधित चोरीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला असून आरोपी विरुद्ध रेल्वे कायद्यानुसार व भादंवि नुसार चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपस गोंदिया पोलीस करत आहेत. 

Edited By : Krushnarav Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com