एक घास मुक्या प्राण्यांसाठी; भिमाशंकर परिसरातील युवकांचा उपक्रम

एक घास मुक्या प्राण्यांसाठी; भिमाशंकर परिसरातील युवकांचा उपक्रम
Bhimashankar

खेड : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असेलेले श्री क्षेत्र भिमाशंकर Bhimashankar मंदिर व परिसरातील पर्यटन कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मागील एक वर्षापासुन बंद असल्याने भिमाशंकर परिसरातील माकडांची व मुक्या प्राण्यांची Animals उपासमार Starvation होत आहे. Initiative Of The Youth Of Bhimashankar Area

अशातच मंचर Manchar शहरातील काही युवकांनी Youth सामाजिक बांधिलकी जपत एक घास मुक्या प्राण्यांसाठी हि संकल्पना Concept हाती घेऊन भिमाशंकर परिसरात 1 हजार कलिंगड व 20 कॅरेट केळी माकड व मुक्या प्राण्यांना खाऊ Food घातली आहे. 

भिमाशंकर परिसरातील वन्यप्राणी भाविक व पर्यटकांनी दिलेल्या खाण्याच्या वस्तूंवरच आपली गुजराण करत असतात. मात्र मागील वर्षभरापासुन मंदिर व पर्यटन बंद असल्याने पाण्याच्या व अन्नाच्या शोधासाठी भटकंती करत असताना माकडांची व मुक्या प्राण्यांची उपासमार होत होती. मात्र या तरुणांच्या सहकार्यातुन जंगली प्राण्यांना दिलासा मिळाला. Initiative Of The Youth Of Bhimashankar Area

भिमाशंकर परिसरातील असंख्य जंगली मुक्या प्राण्यांचा उदरनिर्वाह हा पर्यटन व भाविकांवर अवलंबुन आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मागील वर्षभरापासुन भिमाशंकर मंदिर परिसरातील पर्यटन बंद असल्याने भाविकांसह पर्यटन या परिसरात येत नसल्याने या प्राण्यांची उपासमार होत आहे.

अशात मंचर शहरातील आकाश मोरडे, महेश घोडके, प्रशांत मोरडे, जयेश भालेराव, शुभम गवळी, स्वप्निल लोखंडे, आदित्य चौगुले, रोहन जंगम या तरुणांनी एकत्र येऊन सामाजिक बांधिलकीतुन एक घास मुक्या प्राण्यांसाठी देत केळी व कलिंगडचे वाटप केले आहे. 

Edited By : Krushnarav Sathe 

हे देखील पहा -

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com