छत्रपती संभाजी राजेंचा आदर्श नारायण राणेंनी घ्यावा - विनायक राऊत

छत्रपती संभाजी राजेंचा आदर्श नारायण राणेंनी घ्यावा - विनायक राऊत
raut and rane.jpg

रत्नागिरी - छत्रपती संभाजी राजेंचा Sambhaji Raje आदर्श नारायण राणेंनी Naryan Rane घेतला पाहिजे असा टोला विनायक राऊत Vinyak Raut यांना खासदार नारायण राणे यांना लगावला आहे. ते आज लांजा येथे बोलत होते. छत्रपती संभाजी राजे हे मोठं व्यक्तिमत्त्व आहे, ते आदरणीय आहेत. संभाजी राजे आणि नारायण राणे यांची तुलना कधी होऊ शकत नाही. नारायण राणे यांच्या सारखा एक स्वार्थी राजकारणी ज्याप्रमाणे सारखा पक्ष बदलून आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतो तशा प्रकारची कारकीर्द संभाजी राजेंची नाही.  Narayan Rane should follow the example of Chhatrapati Sambhaji maharaj

एक ध्येयवादी, विचार वादी आणि एखादं काम हाती घेतलं की त्याच्या यशस्वीततेसाठी प्रयत्न करणे, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे, संभाजी राजेंचा आदर्श नारायण राणेंनी घेतला पाहिजे असं माझं मत असल्याचा टोला खासदार राऊत यांना खासदार नारायण राणे यांना लगावला आहे.त्यामुळे एकदा नारायण राणेंचा खरपुस समाचार विनायक राऊत यांनी घेतला आहे.

हे देखील पहा -

पुढे ते  देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis यांच्यावर टीका करता म्हणाले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सध्या काही कामधंदा राहिलेला नाही. दिल्लीवाल्यांनी सुद्धा त्यांना बाजूला केलेलं आहे. माननीय नितीन गडकरी यांनी सुद्धा शहाण्याला समजवायचं तसं समजवलं आहे. मात्र त्यांना ते मान्य नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांचं सध्या एकच काम आहे ठाकरे सरकारवर टीका करणे बाकी त्यांना काही काम नाही.अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी यावेळी केली.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com