राजगुरुनगरमध्ये बेकायदेशीर देशी दारु अड्ड्यावर पोलीसांचा छापा

राजगुरुनगरमध्ये बेकायदेशीर देशी दारु अड्ड्यावर पोलीसांचा छापा
Khed

राजगुरूनगर : कोरोनाच्या Corona पार्श्वभुमीवर दारुबंदी करण्यात आली आहे. मात्र राजगुरुनगर Rajgurunagar शहरालगत असणाऱ्या अण्णाभाऊ साठेनगर मध्ये बेकायदेशीररित्या Illegal देशी दारु  Liquor विक्री Sale जोमात सुरु होती.

पोलिसांना Police याची खबर लागली आणि राजगुरुनगर पोलीसांनी छापा Action टाकुन 28 हजारांची देशी दारु जप्त केली आहे. देशी दारु विक्री करणाऱ्या रोहिदास माने विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हे देखील पहा -

बेकायदेशीर दारु विक्री विरुद्ध राजगुरूनगर पोलीसांची धडक कारवाई मोहिम सुरु आहे. राजगुरुनगर शहारातील पुणे नाशिक महामार्गलगत असणाऱ्या साठे नगरमध्ये रोहिदास माने हा त्याच्या घराशेजारी देशी दारू विक्री करत होता.

त्यानुसार खेड पोलीस स्टेशनच्या गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकुन 28,192 रुपये किमतीचा देशी दारू हस्तगत करत देशी दारु विक्री करणाऱ्या  रोहिदास मानेवर राजगुरुनगर पोलीसांत गुन्हा दाखल केला आहे. 

सदरची कारवाई पोलीस निरिक्षक सतीश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक पोलिस अंमलदार सचिन जतकर , शेखर भोईर , स्वप्निल गाढवे, निखिल गिरीगोसावी, श्रद्धा मालवणकर, सारीखा बोरकर, विशाल कोठावळे, संदीप कारभल, मंगेश अभंग यांनी केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com