‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’ नैतिकदृष्ट्या अस्वीकारार्ह....

‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’ नैतिकदृष्ट्या अस्वीकारार्ह....
Punjab and Haryant High Court Opposes Live in relationship

चंडीगड : लिव्ह-इन- रिलेशनशिप LIve In Relationship ही नैतिक आणि सामाजिकदृष्ट्या अस्वीकारार्ह असल्याचे सांगताना पंजाब Punjab आणि हरियाना Haryana उच्च न्यायालयाने High Court आज अशाच एका प्रकरणामध्ये संरक्षण मागणाऱ्या दाम्पत्याची याचिका फेटाळून लावली. Punjab and Haryana High Court gives verdict against Live in relationship

गुलझा कुमारी (वय १९) आणि गुरविंदर सिंग (वय २२) या दोघांनी ही याचिका सादर केली होती. मागील काही दिवसांपासून ते एकत्र राहत होते. आपण लवकरच विवाह करणार असल्याचेही त्यांनी न्यायालयास सांगितले होते. गुलझा कुमारी यांच्या पालकापासून आमच्या जिवाला धोका असल्याने संरक्षण दिले जावे अशी मागणी, त्यांनी केली होती.

हे देखिल पहा 

‘‘या प्रकरणामध्ये याचिकाकर्ते हे लिव्ह-इन- रिलेशनशिपला मान्यता मिळवू पाहत आहेत. हे नैतिक आणि सामाजिकदृष्ट्या शक्य नाही त्यामुळे या प्रकरणामध्ये संरक्षणाचे आदेश दिले जाऊ शकत नाही, परिणामी आम्ही ही याचिका फेटाळून लावत आहोत.’’ असे न्या. एच.एस मदान यांनी ११ मे रोजी दिलेल्या आदेशांत म्हटले आहे. Punjab and Haryana High Court gives verdict against Live in relationship

याचिकाकर्त्यांचे वकील जे.एस. ठाकूर यांनी सिंग आणि कुमारी हे दोघेही तरणतारण जिल्ह्यामध्ये एकत्र राहत असल्याचे सांगितले. कुमारीचे आई-वडील हे लुधियानात वास्तव्यास असतात त्यांचा या संबंधांना विरोध आहे. गुलझा कुमारीचे सगळे दस्तावेज हे तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात असल्याने त्यांना विवाह करणे शक्य नसल्याचे त्यांच्या वकिलांनी न्यायालयास सांगितले पण न्यायालयाने ही बाब अमान्य केली.

Edited By - Amit Golwalkr

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com