होमगार्ड जवानांच्या सतर्कतेमुळे दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

होमगार्ड जवानांच्या सतर्कतेमुळे दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद
homeguardhomeguard

पुणे : ड्युटी Duty संपवून घरी जात असलेल्या दोन होमगार्ड Home Guard  जवानांच्या सतर्कतेमुळे Vigilance नांदेड Nanded (ता.हवेली) Haveli येथून दरोड्याच्या Robbery तयारीत असलेल्या टोळीला Gang जेरबंद Arrest करण्यात हवेली पोलिसांना Police यश आले आहे. Robbers Arrested Due To Vigilance Of Home Guard Personnel

दरोडेखोरांनाकडून सात कोयते, पाच लोखंडी रॉड व दोन लाकडी दांडे असा मोठा घातक शस्त्रसाठा Arsenal जप्त करण्यात आला असून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर आठ आरोपी फरार झाले आहेत.

हे देखील पहा -

सचिन गोविंद कुऱ्हाडकर, अखिलेश हनुमंत पवार, हनुमंत सुरेश विटकर, आशिष राजेश देवकर व अरमान रमजान खान ( सर्व राहणार जे.पी.नगर वसाहत, सिंहगड रस्ता, नांदेड ता.हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. Robbers Arrested Due To Vigilance Of Home Guard Personnel

तर आकाश शिंदे, शुभम शिंदे, मुन्ना हजाने, कुमार दुपारगुडे, मनोज कुऱ्हाडकर,रवि गायकवाड, रोहित मुळे,साहील कांबळे (सर्व राहणार जे.पी.नगर वसाहत सिंहगड रस्ता, नांदेड ता.हवेली) अशी फरार झालेल्या आरोपींची नावे आहेत.

यातील जवळपास सर्व आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. रात्री 8 वाजेच्या सुमारास होमगार्ड जवान गोविंद रजपूत व शांताराम राठोड हे ड्युटी संपवून घरी जात असताना त्यांना नांदेड फाट्याजवळील कालव्याजवळ तरुणांची गर्दी दिसली व त्यांच्या हातात धारदार शस्त्रे दिसल्याने संशय आला. Robbers Arrested Due To Vigilance Of Home Guard Personnel

होमगार्ड जवानांनी तात्काळ पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांना याबाबत माहिती दिली व तरुणांचा पाठलाग सुरू केला. पोलीस निरीक्षक शेलार मिळालेल्या माहितीनुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांसह नांदेड मधील घाडगे इस्टेट परिसरात दाखल झाले व त्याठिकाणी अंधारात लपून बसलेल्या आरोपींना शस्त्रांसह जेरबंद केले. यातील आठ आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com