लहान मुलांनी तयार केले सीडबॉल

लहान मुलांनी तयार केले सीडबॉल
bhandara

भंडारा - अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून मोठ्यांनाही समज मिळेल असे काम केले जाऊ शकते हे भंडारा Bhnadara जिल्ह्याच्या साकोली Sakoli येथील संघाच्या बाल स्वयंसेवकांनी पर्यावरण दिनाच्या निमित्ताने दाखवून दिले आहे. Seedball made by children

निरुपयोगी समजल्या जाणाऱ्या फळझाडांच्या बियांना मातीत मिसळून सीडबॉल Seedball तयार करीत या बालकांनी ते डोंगरावर टाकून भविष्यातील डेरेदार झाडांचे Tree स्वप्न पाहिले आहे. प्रत्येक वेळी अन्य साधनसामुग्रीचीच आवश्यकता असते असे नाही, आपल्याकडे असलेल्या टाकाऊ गोष्टीतूनही बरेच काही साध्य केले जाऊ शकते हे ह्या बाल स्वयंसेवकांनी दाखवून दिले आहे.

उपलब्ध असलेल्या जांभूळ, चिंच आंबा आणि इतर अनेक झाडांच्या बिया एकत्रित करून मातीच्या गोळ्यांमध्ये त्या बिया टाकण्यात आल्या असून घरी बनविलेले हे सीडबॉल वाळल्या नंतर साकोली शहराच्या बाजूला असलेल्या या डोंगराळ भागात जाऊन ते बॉल मातीत टाकून देण्यात आले आहेत. Seedball made by children

हे देखील पहा -

पावसाळ्यात Rain या बॉलमध्ये असलेल्या बियांपासून रोपटे तयार होऊन भविष्यात मोठे झाड तयार होण्याची अपेक्षा या चिमुकल्यांनी पहिली आहे. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी शासन स्तरावरून अनेक प्रयत्न केले जातात,आवाहन लोकांना केले जाते. मात्र आज झाडे लावण्यासाठी वेळ नसला तरी सिडबॉल तयार करून झाडे लावण्याचा चिमुकल्यांनी Children केलेला हा संकल्प नक्कीच कौतुकास्पद आहे. 

Edited By : Krushnarav Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com