... वादळाच्या संकटात आजोबा बनले कुटुंबाची ढाल!

... वादळाच्या संकटात आजोबा बनले कुटुंबाची ढाल!
Rantnagiri Senior Citizen saved grandson from Tree Collapse

रत्नागिरी : तौत्के चक्रीवादळाचा Tautkae Cyclone परिणाम कोकण Konkan किनारपट्टीवर चांगलाच जाणवला. किनारपट्टीभागातील घरांच मोठं नुकसान झालं आहे. खाडीपट्ट्यात देखील याचा प्रभाव जाणवला. या खाडीपट्ट्याशेजारी असणा-या कर्ला- आंबेशेत गावात मोठ मोठ्या झाडांची पडझड झाली. या वादळातील अंगावर शहारे आणणारा प्रसंग आंबेशेतमधील कळंबटे कुटूंबीयांनी अनुभवला..आणि याच संकटातून आजोबांनी Grandfatherआपल्या नातवाला सुखरुप बाहेर काढले. Senior Citizen From Ratnagir Saved his grandson from Tree Collapse

रत्नागिरीतील Ratnagiri आंबेशेत गावातील अशोक कळंबटे...या आजोबांच वय साधारण ५ च्या घरात. मात्र त्यांनी  तौत्के चक्रीवादळाच्या संकटाचा सामना धीराने केला. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस यात आजोबांच्या घरावर पुराणवृक्ष कोसळला. दोन भलीमोठी झाडं त्यांच्या घरावर कोसळली. झाड कोसळल्याचं लक्षात आल्यानंतर आजोबांनी आपल्या नातवाला काही होणार नाही याची खबरदारी घेतली. या दुर्घेटनेत आपल्या जिवाचा कोट करून आजोबांनी आपल्या नातवाला सुखरुप बाहेर काढले.  

पाच वर्षाचा नातू वेदांत कळंबटे आपले आजोबा अशोक कळंबटे यांच्यासोबत होता. घरावर झाड पडत असताना या घरात अशोक यांची पत्नी सुगंधा त्यांचा मुलगा भालचंद्र आणि भालचंद्र याची पत्नी रुणाली होती. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घरावर झाड कोसळण्याची भिती असलेल्या अशोक यांनी झाड तुटल्याचा भला मोठा आवाज आला.

त्याचवेळी समोरून नातू वेदांत दुसऱ्या रुममध्ये जात होता. झाड पडल्याची कल्पना आलेल्या अशोक यांनी आपला नातू झाड पडत असलेल्या दिशेने जात असल्याचं लक्षात आले. काही क्षणात अशोक यांनी आपल्या नातवाला धरले. त्याच्या अंगावर स्वतः झोपले आणि या नैसर्गित आपत्तीत नातवाला काही होणार नाही याची खबरदारी घेत आपल्या जिवाची पर्वा न करता नातवाचा जीव वाचवला. Senior Citizen From Ratnagir Saved his grandson from Tree Collapse

या धावपळीत त्यांच्या पत्नीच्या डोक्याला पत्रा लागला आणि दुखापत देखील झाली. तौत्के वादळ पाच वर्षाच्या वेदांत कळंबटे यानं अनुभवलं. वादळ आलं तेव्हा वेदांत देवघरात होता. भलं मोठ झाड कोसळलं आणि वेदांत आजोबांच्या दिशेने पळत गेला. वेदांतला आजोबांनी सुखरुप बाहेर काढलं. 

आपल्या नातवाच्या अंगावर येणारं स्वतः आजोबांनी झेललं त्यांच्या पाठीला देखील यात दुखापत झाली. वादळाच्या या संकटात आजोबा नातवापुढे एका सावलीसारखे उभे राहीले. आजोबांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या नातवाला वाचवले, पण कुटुंबाची ढाल बनूनही कळबंटे आजोबा पुढे आले.

Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com