सोलापूरकरांनो रक्तदान करा! अवघे तीन ते 4 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा 

सोलापूरकरांनो रक्तदान करा! अवघे तीन ते 4 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा 
Blood Donation

सोलापूर: कोरोना (Corona) महामारीच्या दुसऱ्या लाटेत सोलापूरमध्ये (Solapur) भयंकर असा रक्ततुटवडा निर्माण झाला आहे. आता सोलापुरकरांनीपुढे येऊन रक्तदान (Blood donation) करण्याची गरज निर्माण झाली आहे. Severe Shortage of Blood in Solapur Only Three days Stock Remained

फक्त तीन ते चार दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक राहिला आहे. सोलापूर मधील सिव्हील हॉस्पिटलमध्ये (Civil Hospital) असलेल्या रक्तपेढीत देखील रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. सोलापुरातील खासगी आणि  सरकारी रुग्णालये कोरोना रुग्णांमुळे खचाखच भरली आहेत.

रेमडेसिव्हीर (Remdesivir) इंजेक्शनचा तुटवडा झाल्यामुळे आता रक्तसाठा कमी होत आहे. दरम्यान, रक्तसंकलन कोविड लसीकरण (Vaccination) मोहिमेमुळे देखील कमी पडत आहे. Severe Shortage of Blood in Solapur Only Three days Stock Remained

कारण 45 वर्षे वयापुढील लसीकरण घेतलेल्या नागरिकांना लसीकरणाच्या नंतर दीडमहिना रक्तदान करू नका असे सांगितले जाते. परंतु याचा परिणाम थेट पेढ्यांवर होत आहे. सोलापुरात मात्र आता फक्त तीन ते चार दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. Blood Donation Drive is necessary in Solapur Due to severe Shortage

दररोज 100 जणांनी रक्तदान करणे सोलापूर शहरातील कोविड बाधित रुग्णांची वाढत चाललेली संख्या पाहता गरजेचे आहे. आठवड्याला 130 थैलेसिमिया रुग्णांना रक्त दिले जाते. यांसाठी रक्त राखीव ठेवावे लागते. सोलापुरकरांनी पुढाकार घेऊन शहर आणि  जिल्ह्यात असलेल्या 17 रक्तपेढ्या मध्ये जाऊन रक्तदान करावे. अन्यथा रक्ताच्या कमतरतेमुळे रुग्णांचा जीव जाऊ शकतो.

Edited by- Sanika Gade. 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com