देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकाचा कोरोना विरुध्द लढा

देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकाचा कोरोना विरुध्द लढा
pandharpur

पंढरपूर : भारतीय सैन्य Indian Army दलात सुभेदार Subedar म्हणून कार्यरत असलेले श्री.हणमंत काळे यांनी देश सेवेबरोबर कोरोना Corona  महामारीच्या संकटकाळात खरसोळी (ता.पंढरपूर) येथील दोन हजार ग्रामस्थांना Villagers सॅनिटायझर Sanitizer, मास्क Mask आणि अर्सेनिक अल्बमच्या Arsenic Album गोळ्यांचे मोफत वाटप Help केले आहे. Soldier Serving In The Indian Army Helps Villagers To Fights Against Corona

गावात कोरोनाचा फैलाव वाढल्याचीमाहिती मिळताच 15 दिवसांची सुट्टी घेवून श्री. काळे हे गावकऱ्यांच्या मदतीसाठी सेवदूताप्रमाणे धावून आले आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे व गावावर असलेल्या प्रचंड प्रेमाचे पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी त्यांची भेट घेऊन कौतुक केले.

हे देखील पहा -

श्री.काळे हे बडोदा येथे भारतीय सैन्य दलात सुभेदार पदावर कार्यरत आहेत. गेल्या 19 वर्षापासून ते भारतमातेची सेवा करत आहेत. नेहमीच गावाबद्दल प्रेम असलेल्या सुभेदार काळे यांना आपल्या गावात कोरोनाची साथ झपाट्याने वाढत असल्याची माहिती मित्रांनी दिली. Soldier Serving In The Indian Army Helps Villagers To Fights Against Corona

त्यानंतर त्यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्याकडे 15 दिवसांच्या सुट्टीची मागणी केली. वरिष्ठांनी देखील कोरोना संकट काळात आपला जवान मदतीसाठी धावून जात असल्याने तत्काळ  सुट्टी मंजूर केली.

गावात आल्यानंतर त्यांनी पहिल्याच दिवशी संपूर्ण गावात निर्जंतुकीकणाची फवारणी केली. गावात प्रत्येकाच्या घरोघरी जावून मास्क आणि सॅनिटाझरचे वाटप केले. ग्रामस्थांची रोगप्रतिकार शक्ती वाढावी यासाठी अर्सेनिक अल्बमच्या गोळ्यांचेही वाटप केले. गेल्या आठ दिवसांपासून त्यांचा गावात कोरोना विरुध्दचा लढा सुरु आहे. त्यांच्या या लढयाला आता काही प्रमाणात यश देखील आले आहे. Soldier Serving In The Indian Army Helps Villagers To Fights Against Corona

खरसोळी गावात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 124 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.  यामध्ये 5 जणांचा मृत्यु झाला आहे. 45 रूग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुभेदार काळे यांच्या माध्यमातून सोमवारी गावात कोरोना चाचणी कॅम्प घेण्यात आला. 30 जणांमध्ये 5 नवे कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत.

तुलनेने हे प्रमाण कमी झाले आहे. ग्रामस्थांमध्ये त्यांनी कोरोना संसर्गाची जनजागृती केल्यामुळे कोरोनासंसर्ग कमी झाल्याचे येथील माजी ग्रामपंचयात सदस्य छगन पवार यांनी सांगितले. Soldier Serving In The Indian Army Helps Villagers To Fights Against Corona

त्यांच्या उपक्रमाला  माजी सरपंच दिंगबर कांबळे, मोहन काळे, विकास पवार, विजय पाटील, अमर पवार यांना साथ दिली आहे. सैनिक हणमंत काळे यांच्या कार्याची माहिती मिळाल्यानंतर पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी प्रत्यक्ष खरसोळी येथे भेट देवून त्यांचे कौतुक देखील केले.
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com