जावयाला सासू-सासऱ्यांना द्यावी लागणार पोटगी

जावयाला सासू-सासऱ्यांना द्यावी लागणार पोटगी

जावयाला सासू-सासऱ्यांना द्यावी लागणार पोटगी
सुनेवरही सासू-सासऱ्यांना निर्वाह भत्ता देणं बंधनकारक
केंद्र सरकार करणार कायद्यात नवी दुरुस्ती

संपत्तीत सगळे वाटेकरी पण सांभाळ करण्यास कोणीही तयार नाही अशी अनेक वृद्धांची अवस्था आहे. त्यामुळंच केंद्र सरकारनं आता वृद्धांसंदर्भातल्या कायद्यात दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार आता जावई आणि सून पोटगीच्या कक्षात आलीय.

वृद्ध आईवडिलांचा सांभाळ करणं ही मुलांची जबाबदारी होती. पण वृद्धांच्या हक्क आणि अधिकारांसंदर्भात सध्याचा कायदा कमी पडू लागलाय. त्यामुळं आता केंद्र सरकारनं या कायद्याची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार ज्येष्ठ नागरिक निर्वाह आणि कल्याण दुरुस्ती विधेयक सरकारनं आणण्याचा निर्णय घेतलाय. GFXIN या कायद्यातल्या नव्या प्रस्तावानुसार संपत्तीतल्या सर्व वारसदारांना वृद्धांना निर्वाह भत्ता देणं बंधनकारक आहे. सून, जावई, मुली, दत्तक मुलं, सावत्र मुलं यांना वृद्धांचा सांभाळ करावा लागणार आहे.घरातल्या ज्येष्ठांची मालमत्ता हडप केल्यास कुटुंबातल्या या सदस्यांवर कारवाई होणार आहे. GFXOUT कायदेतज्ज्ञांनी सरकारत्या या निर्णयाचं स्वागत केलंय.

एकट्या राहणाऱ्या वृद्धांचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून गंभीर होत चाललाय. नातेवाईकांकडून संपत्ती हडपण्यासाठी नातेवाईकांकडून छळ केला जातो. प्रसंगी त्यांना एकटं टाकलं जातं. या कायद्यांमुळं ज्येष्ठांना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळणार आहेत.
 

पाहा या बातमीचा संपुर्ण व्हिडीओ-

SPECIAL REPORT | आता जावई आणि सुनेलाही द्यावी लागणार सासू-सासऱ्यांना पोटगी, पाहा काय आहे नियम https://youtu.be/DjWRTsDJ-zI

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com