उजनीच्या पाण्यावरुन पंढरपुरात आंदोलनाचा भडका

उजनीच्या पाण्यावरुन पंढरपुरात आंदोलनाचा भडका
Ujani Water Issue Agitation

पंढरपूर  : उजनीच्या पाण्यावरुन सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. इंदापूरला पाणी वळण्याचा निर्णय
अधिकृतरित्या रद्द करावा या मागणीसाठी उजनी धरण पाणी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी आज पंढरपूर तालुक्यातील उपरी येथे पंढरपूर - सातारा राष्ट्रीय महामार्गावर टायर पेटवून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या विरोधात आंदोलन केले. Ujani Water issue took Ugly turn today in Pandharpur

उजनी धरणातून इंदापूरला   पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णया नंतर सोलापूर जिल्ह्यातील
शेतकऱ्यांनी उजनी धरणातून इंदापूरला पाणी देण्यास विरोध केला आहे. शेतकऱ्यांचा वाढता विरोध झाल्यानंतर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मागील आठवड्यात उजनीतून इंदापूरसाठी मंजूर केलेल्या पाच टीएमसी पाण्याचा निर्णय रद्द केल्याचे जाहीर केले आहे.

हे देखिल पहा

दरम्यान त्यांच्या या घोषणेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातून उजनी धरणात येणाऱ्या सांडपाण्याचे मोजमाप करण्यासाठी जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त तीन अधिकाऱ्यांची समिती गठीत केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील  शेतकऱ्यांमधून तीव्र  संताप व्यक्त केला जात आहे. Ujani Water issue took Ugly turn today in Pandharpur

सांडपाण्याच्या नावाखाली इंदापूरला मंजूर केेलेले पाच टीएमसी पाणी त्वरीत रद्द करुन तसा शासन आदेश काढावा या मागणीसाठी आजपासून पाणी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाभरात आंदोलन सुरु केले आहे .आज पंढरपुरात या  आंदोलनाची पहिली ठिगणी पडली.

पाणी संघर्ष समिती व शेतकऱ्यांनी इंदापूरसाठी मंजूर केलेलेे पाणी रद्द करावे या मागणीसाठी पंढरपूर सातारा राष्ट्रीय महामार्गावर टायर पेटवून सरकार विरोधात आंदोलन केले. हे आंदोलन पुढच्या काळात अधिक तीव्र  होण्याची शक्यता आहे.

Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com