तलावात बुडून एकाच कुटुंबातील तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

तलावात बुडून एकाच कुटुंबातील तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू
Swimming Death

जालना : पाझर तलावातील पाण्यात बुडुन एकाच कुटुंबातील ३ मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बदनापूर Badanapur तालुक्यातील मुसळी Musali गावामध्ये घडली आहे. मृतांमध्ये दोन सख्ख्या बहिण भावांसह चुलत भावाचा समावेश आहे. Unfortunate death of three children of the same family by drowning in a lake

मुसळी गावात असणाऱ्या पाझर तलावात Lake पोहण्यासाठी Swimming गेलेल्या एकाच कुटुंबातील ३ लहान मुलांचा Children  पाण्यात बुडून मृत्यू Death झाला आहे. जालना Jalna जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील कुसळी गावच्या शेतवस्तीवर आज दुपारी ४ वाजेच्या दरम्यान ही दुर्घटना घडलीय.

मृतांमध्ये सख्ख्या बहीण भावासह एका चुलत भावाचा समावेश आहे.१० वर्षीय दीपाली वैद्य,११ वर्षीय मनोज वैद्य,७ वर्षीय अक्षय वैद्य अशी मृत्युमुखी पडलेल्या भावंडांची नावं आहेत.

हे देखील पहा -

कुसळी येथील शेतवस्तीवरील पाझर तलावात पावसाचं ५ ते ६ फूट पाणी साचलंय. या पाण्यात पोहण्यासाठी एकाच कुटुंबातील ४ भावंडं गेले होते पण पाण्याचा अंदाज न आल्याने यातील दीपाली, अक्षय आणि मनोज यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

तर एका जणाला वाचवण्यात यश आलं. दरम्यान या घटनेमुळे परीसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे. बदनापूर पोलिसांनी Police घटनास्थळी जाऊन या घटनेचा पंचनामा केला आहे.

Edited By : Krushnarav Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com