आमदारांच्या चिठ्ठी शिवाय लस घेता येणार नाही, लसची चिठ्ठी व्हायरल
letter news

आमदारांच्या चिठ्ठी शिवाय लस घेता येणार नाही, लसची चिठ्ठी व्हायरल

मावळ - तालुक्याचे राष्ट्रवादीचे NCP आमदार सुनील शेळकेंच्या Sunil Shelke चिठ्ठी Letter शिवाय लसीकरण होत नाही. आमदार MLAशेळकेंच्या नावाची तशी चिठ्ठी देखील  प्रसार माध्यमांवर व्हायरल होत आहे. ज्यांनी नोंद केलेली नाही त्यांना देखील तशी चिठ्ठी दिली जाते, पण तेव्हा तिथं नोंदणीकृत व्यक्ती आल्यावर मात्र गोंधळ उडत असल्याचं प्रशासनातील सूत्रांनी माहिती दिली. Vaccination cannot be done without MLAs letter vaccine letter goes viral

होय आम्ही अशी प्रक्रिया राबवत आहोत. हा विरोधाचा डाव आहे. लसीकरण केंद्रावर गर्दी होऊ नये म्हणून तसा निर्णय घेतला आहे. माझे कार्यकर्ते मी केंद्रावर तैनात केलेत. ते केंद्रावरील आरोग्य विभागाची या अनुषंगाने मदत करतात.

हे देखील पहा -

आता अशी मदत करण्याला आक्षेप घेण्याचं नक्कीच कारण नाही. ज्यांना नोंदणी करता येत नाही, त्यांना आम्ही जागेवर नोंदणी करून देतो. त्यामुळे कोणताच गोंधळ उडत नाही, असा दावा आमदार सुनील शेळके यांनी केला आहे आणि चिठ्ठी चा प्रकार सुरूच राहणार असल्याचेही आमदारांनी स्पष्ट केले आहे.Vaccination cannot be done without MLAs letter vaccine letter goes viral

उद्दिष्ट हे गर्दी टाळण्याचे आहे. असं स्पष्टीकरण आमदारांनी दिले. माझ्या नावाच्या चिट्टी शिवाय लसीकरण होत नाही, असं म्हणणाऱ्यांनी ते सिद्ध करून दाखवावं, असं आव्हान त्यांनी चिठ्ठी व्हायरल करणाऱ्यांना दिले आहे. स्थानिक प्रशासनाला याबाबत विचारले असता, त्यांची आम्हाला मदत होते असे उत्तर देण्यात आले. आमदारांचे नाव चिठ्ठी वर का टाकले आहे, प्रशासन अशी चिट्टी देऊ शकते का? यावर मात्र त्यांनी बोलणं टाळले.

Edited By - Shivani Tichkule

 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com