केश कर्तन व्यवसायिक विकतोय केसर आंबा

केश कर्तन व्यवसायिक विकतोय केसर आंबा
Yavatmal Saloon Owner selling Mangoes

यवतमाळ : संपूर्ण देशात गेल्या एका वर्षांपासून  कोरोनाने Corona थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्वत्र टाळेबंदी लागू केली आणि या टाळेबंदीत Lock Down सर्वच व्यवसाय आर्थिक डबघाईस आले. कसेबसे व्यवसाय Profession पूर्वपदावर येत असतांना पुन्हा टाळेबंदी लागली आणि अनेकांचे कुटुंब आर्थिक परिस्थिती अभावी उपासमारीच्या उंबरठ्यावर जीवन जगत आहेत. कोरोनाने सर्वच व्यवसाय आर्थिक संकटाचा सामना करत असतांना यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस Digras येथील एक केश कर्तनाचा व्यवसाय करणारा कारागीर चक्क केसर अन दसेरी आंबा Mango विकून आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी धडपड करत आहे. Yavatmal Saloon Owner selling Mangoes to Survive 

हळूहळू केश कर्तनाचा व्यवसाय Hair Cutting Saloon पूर्वपदावर येत असतांना पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि महाराष्ट्र शासनाने Maharashtra Government राज्यात कडक निर्बंधांसह संचारबंदी लागू केली. यामध्ये केवळ अत्यावश्यक सेवेच्या दुकानांनाच सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली. त्यामुळे इतर व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांपुढे पुन्हा आर्थिक संकट उभे राहिले आणि कुटूंबाचा गाडा कसा ओढावा हा प्रश्न निर्माण झाला. केशकर्तनाचा व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांची सुद्धा बिकट परिस्थिती झाली. 

केशकर्तनाचे व्यवसाय बंद असल्याने आपल्या कुटुंबीयांना जगवायचे कसे असा प्रश्न उपस्थित झाला. ते म्हणतात ना गरज ही शोधाची जननी आहे आणि तसंच झालं. दिग्रस येथील तहसील चौक परिसरात केश कर्तनाचा व्यवसाय करणाऱ्या बाळासाहेब आंबेकर यांनी आपल्या कुटूंबाचा आर्थिक गाडा हाकण्यासाठी अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या फळ विक्रीचा व्यवसाय करण्याचे ठरवले. Yavatmal Saloon Owner selling Mangoes to Survive 

सध्या आंब्याचा सिझन सुरू आहे. या दिवसांत रसाळ आंब्यांची मोठी मागणी असते हीच मागणी लक्षात घेऊन आंबेकर यांनी आपल्या केशकर्तनाच्या दुकानापुढे केसर अन् दसेरी जातीचे आबे विक्रीसाठी उपलब्ध करून घेतले. कोरोनाचे संकट ओढवले असतांना कुटूंबियांसाठी चालू असलेली आंबेकर यांची धडपड नक्कीच कौतुकास्पद आहे.
Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com