युवकानं चक्क स्वतः बनवलेला बाँब घेऊन गाठलं नागपूरचं पोलिस स्टेशन...

युवकानं चक्क स्वतः बनवलेला बाँब घेऊन गाठलं नागपूरचं पोलिस स्टेशन...
Nandanvan Police Station Nagpur

नागपुर : शहरातील Nagpur नंदनवन पोलीस Police ठाण्याच्या हद्दीतील साईबाबा नगर परिससरात राहणाऱ्या एका राहुल युवराज पगाडे नामक २५ वर्षीय युवकाने चक्क सोशल मिडिया व्हिडिओ साईट Social Media बघून बॉम्ब Bomb सदृश वस्तू तयार केली. मात्र त्यानंतर तो बॉम्ब निकामी करता येत नसल्याने राहुल पगाडे तो बॉम्ब घेऊन थेट नंदनवन पोलीस स्टेशन ठाण्यात दाखल झाल्याने संपूर्ण पोलीस ठाण्यात प्रचंड खळबळ उडाली होती. Youth Prepared Crude Bomb with help of Video Channel

राहुलने बॉम्ब असलेली बॅग आपल्याला बेवारस पडलेली दिसल्याचं सांगितलं. मात्र, त्याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली तेव्हा त्यानेच तो बॉम्ब सोशल मिडिया व्हिडिओ साईटवर बघून तयार केल्याची कबुली दिली. त्यानंतर नंदनवन पोलिसांनी बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करून तो बॉम्ब निकामी केला आहे. पोलीस सध्या विषयावर बोलायला तयार नाहीत. 

हे देखिल पहा

आरोपी राहुल युवराज पगाडे याने या चॅनेलवर वर गावठी बॉम्ब बनविण्याचे व्हिडीओ पाहुन त्याकरीता लागणाऱ्या साधन सामुग्रीची जुळवाजुळव केली. त्यानंतर सर्व वस्तू एकत्र करून त्याने गावठी बॉम्ब तयार केला. परंतु, सदर गावठी बॉम्ब  निकामी करता येत नसल्याने राहुल  तो बॉम्ब एका बॅगमध्ये भरून नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये घेवून आला. अचानक एक तरुण चक्क बॉम्ब घेऊन पोलीस ठाण्यात आल्याने सर्वांची भंबेरी उडाली होती. Youth Prepared Crude Bomb with help of Video Channel

अखेर बॉम्ब निकामी करण्यात आला.नंदनवन पोलिसांनी या घटनेची सूचना बॉम्ब शोधक पथकाला दिली,तेव्हा बीडीडीएस पथकाने तो गावठी बॉम्बचे इलेक्ट्रिक सर्कीट बॅटरी पासुन वेगळे करून निकामी केला केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरूध्द कलम २८५,२८६ भादवि सहकलम ७,२५ ( १ ) ( क ) भारतीय हत्यार कायदा, सहकलम १२३ मपोका अन्वये गुन्हा नोंदविला आहे .

Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com