चंद्रपुरात रेमडेसिव्हीर इंजेक्शनसाठी नागरिकांचे हाल... 

संजय तुमराम
बुधवार, 14 एप्रिल 2021

कोरोना रुग्णांसाठी महत्त्वपूर्ण  ठरत असलेल्या  रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा सध्या चंद्रपुरात तुटवडा जाणवत आहे.  काही मोजक्याच मेडिकलमध्ये हे इंजेक्शन उपलब्ध आहे

चंद्रपूर : कोरोना Corona रुग्णांसाठी महत्त्वपूर्ण  ठरत असलेल्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा सध्या चंद्रपुरात Chandrapur तुटवडा जाणवत आहे.  काही मोजक्याच मेडिकलमध्ये हे इंजेक्शन उपलब्ध आहे. रोज कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने या इंजेक्शनच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे या इंजेक्शनसाठी रुग्णांचे नातेवाईक मेडिकल स्टोअर्सचे उंबरठे झिजविताना दिसून येत आहेत. Citizens are suffering for remedivir injection at Chandrapur 

दरम्यान, येथील एका जनऔषधी केंद्रात रेमडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध असल्याची माहिती मिळताच रुग्णांच्या नातेवाईकांनी औषधी केंद्रात गर्दी करत आहेत. दूरपर्यंत रांगा लागल्याने गोंधळ उडत आहे. अखेर नागरिकांच्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांच्या Police फौजफाट्याची मदत घेण्यात आली. मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या लसीबरोबरच रेमडेसिव्हीर Remdesivir इंजेक्शनचीच चर्चा अधिक होत आहे. या औषधाचा सर्वत्र तुटवडा निर्माण झाला आहे. मोजकाच साठा शिल्लक असल्याची माहिती आहे. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक हे इंजेक्शन घेण्यासाठी औषध केंद्रांवर गर्दी करीत आहेत.  

मंगळवारी आझाद बागेलगतच्या रेडक्रास Red Cross भवनातील जनऔषधी केंद्रात नागरिकांनी एकच गर्दी केली होती. दूरपर्यंत नागरिकांनी रांग लावली होती. नागरिक पाच-पाच तास रांगेत राहून ही इंजेक्शन खरेदी करीत होते.  Citizens are suffering for remedivir injection at Chandrapur 

दरम्यान, रांगेतील नागरिकांमध्येच वाद उद्भवत होते. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. ही बाब पोलिसांना  मिळताच शहर पोलिसांचे पथक औषधी केंद्रात दाखल झाले.  उशिरापर्यंत पोलिसांच्या बंदोबस्तात नागरिकांना ही इंजेक्शन रुग्णांच्या नातेवाईकांना दिली जात होती.

Edited By- Digambar Jadhav


संबंधित बातम्या

Saam TV Live