वाशिम जिल्ह्यातील आवरदरी येथील नागरिकांची घोटभर पाण्यासाठी भटकंती .....

गजानन भोयर
मंगळवार, 20 एप्रिल 2021

मालेगाव तालुक्यातील आवरदरी गावात मार्च पासूनच भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून गावातील महिलांना घोटभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे

वाशिम : दिवसेंदिवस कमी होत चाललेल्या पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मालेगाव Malegaon तालुक्यातील आवरदरी Avardari गावात मार्च पासूनच भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून गावातील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.गावात पाण्यासाठी असलेल्या विहिरीची पाणी पातळी खालावली आहे त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे. Citizens of Avardari in Washim district roam for water
 

विहरित साप मेले Dead असल्याने दुर्गंधी युक्त पाणी पिण्यासाठी वापरावं लागत आहे असून अनेक आजार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. मालेगाव तालुक्यातील आवरदरी या  आदिवासी बहुल गावात मार्च महिन्यापासूनच भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. एकीकडे कोरोनाची भीती तर दुसरीकडे पाणी टंचाई त्यामुळं गावातील महिलांवर रात्रंदिवस पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. 

गावातील विहिरी, बोअरवेल्स कोरड्या पडल्या आहेत. गावाला पाण्यासाठी दोन विहिरी आहेत. एक गोड्या पाण्याची तर दुसरी खाऱ्या पाण्याची विहीर आहे. त्यातुन घोट-घोट पाणी जमा करून आणावं लागतं असून ते दूषित पाणी असल्यानं आरोग्यासाठी घातक असल्याचं महिला सांगत आहेत. राज्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याने रोजगाराच्या शोधात बाहेरगावी गेलेले मजूर गावी परतले आहेत.एकीकडे कोरोनाची Corona भीती तर दुसरीकडे दुर्गंधी युक्त पाणी त्यामुळं गावातील नागरिकांवर दुहेरी संकट आले आहे. Citizens of Avardari in Washim district roam for water

जिल्ह्यात दिवसागणिक कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे.त्यामुळे जिल्हा प्रशासन कोरोना व्हायरस संदर्भात उपाययोजना करण्यात मग्ण आहे.मात्र दुसरीकडे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई जाणवत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आवरदरी गावात पाण्याचं टँकर सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Edited By- Digambar Jadhav

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live