पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून नागरिकांची फसवणूक- धनंजय मुंडेंचा घणाघाती आरोप

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 16 जानेवारी 2019

अंबरनाथ - मागील लोकसभा निवडणुकीत दिलेल्या विकासकामांच्या आश्‍वासनाचा विसर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युती सरकारला पडला हे सत्य आहे. त्यांनी देशातील नागरिकांची फसवणूक केली आहे. त्यांच्याच मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांना आता घरी पाठवायचे आहे, असा घणाघात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी अंबरनाथमध्ये केला.

सत्ताधाऱ्यांकडून अंबरनाथमधील विकासकामांच्या बाबतीत पूर्व आणि पश्‍चिम भाग असा भेदभाव केला जातो, असा दावाही त्यांनी या वेळी केला. राष्ट्रवादीच्या वतीने सुरू असलेल्या निर्धार परिवर्तन यात्रेच्या सभेत मुंडे बोलत होते. या वेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री गणेश नाईक, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, प्रदेश सरचिटणीस सुभाष पिसाळ, उपस्थित होते. धनंजय मुंडे यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर घणाघाती टीका केली.

बेस्ट संपाला शिवसेनाच जबाबदार - भुजबळ
बेस्ट कामगारांची अवस्था गिरणी कामगारांसारखी करू नका, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. बेस्ट कामगारांच्या संपाला शिवसेनाच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी बेस्ट कामगारांच्या मागील संपावेळी बेस्ट आणि मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प एकच करू असे आश्‍वासन दिले होते; मात्र ते अजूनही पूर्ण करू शकलेले नाही, असे सांगत भुजबळ यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

Web Title: citizens cheating from Prime Minister, Chief Minister says Dhanjay mundhe

संबंधित बातम्या

Saam TV Live