सांडपाण्यातले मासे पकडण्यापुढे कोरोनाचाही पडला विसर..पहा व्हिडिओ

Peole catching fish in dirty water
Peole catching fish in dirty water

सोलापूर : हुबळीहून Hubli नागपूरला Nagpur मांगूर जातीच्या  माशांचा Fish ट्रक कंबर तलाव परिसरात चालकाकडून कंट्रोल सुटल्याने कंबर तलाव परिसरात धडकला आणि ट्रक मधील मासे सांडपाण्यात पडले. हे मासे पकडण्यासाठी लोक गर्दी करुन सांडपाण्यात उतरले. अखेर त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना Police लाठीमार करावा लागला. Citizens Entered dirty Nallaha to Catch Fish in Solapur

आज सकाळी हा प्रकार सुरु होता. घाण पाण्यात पडलेले मासे वेचण्यासाठी नागरिकांमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचे चित्र होते. सोलापूर Solapur जिल्ह्यात एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांचा Corona Patients आकडा वाढतोय तर दुसरीकडे नागरिकांनी मासे पकडण्यासाठी सोशल डिस्टन्सचे तीनतेरा वाजवले.यामध्ये कोणत्याही नागरिकांच्या तोंडाला मास्क नसल्याचं दिसून येत होते. या सगळ्या प्रकारात सोशल डिस्टन्सचा पार फज्जा उडाला. 

कंबर तलाव परिसरात असलेल्या डबक्यातील घाण पाण्यात मासे पकडत असल्याचा किळसवाणा प्रकार येथे सुरु होता. अखेर हा प्रकार समजल्यानंतर पोलिस आले व त्यांनी नागरिकांना पांगवले. Citizens Entered dirty Nallaha to Catch Fish in Solapur

दरम्यान, सोलापूर शहर आणि जिल्ह्यात ८ ते १५ मे पर्यंत संपूर्ण लॉकडाउन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मात्र ११ आणि १२ तारखेला रमजान,अक्षयतृतीयेच्या निमित्ताने सकाळी ७ ते ११ वाजण्याच्या दरम्यान नागरिकांना किराणा आणि भाजीपाला खरेदीसाठी मुभा देण्यात आली आहे. 
Edited By - Amit Golwalkar
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com