उत्तर पुणे जिल्ह्यात संचारबंदीच्या दुस-या दिवशी नागरिकांकडुन नियमांची पायमल्ली...

रोहिदास गाडगे
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

संचारबंदीच्या दुस-या दिवशी संचारबंदीच्या नियमांची नागरिकांकडुन पायमल्ली होत असल्याचे विदारक चित्र पुण्यात पहायला मिळत आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची नागरिकांना भिती राहिली नाही का असाही प्रश्न उपस्थित होत असताना दिसून येत आहे

पुणे: पुण्याच्या Pune ग्रामीण भागात कोरोना Corona महामारीचे संकट दिवसागणीक द्विशतकाकडे वाटचाल करत असताना पुणे जिल्हा प्रशासनाकडुन Administration संचारबंदीची Curfew कडक अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.  मात्र आज संचारबंदीच्या दुस-या दिवशी संचारबंदीच्या नियमांची नागरिकांकडुन पायमल्ली होत असल्याचे विदारक चित्र पुण्यात पहायला मिळत आहे. Citizens trampled rules on second day of curfew in North Pune district

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची नागरिकांना भिती राहिली नाही का असाही प्रश्न उपस्थित होत असताना दिसून येत आहे. पुण्याच्या ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्नांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. परिणामी कोविड सेंटर फुल झाली आहेत. बेड मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची फरपट सुरु आहे.

तर दुसरीकडे रेमडिसिवीर Remidicivir  च्या तुटवड्याचाही सर्वाधिक फटाका बसत आहे. अशी गंभीर परिस्थिती असतानाही नागरिकांना याचे गांभीर्य राहिले नसुन चाकण Chakan राजगुरुनगर Rajgurunagar शहरांसह पुणे नाशिक Nashik आणि राजगुरुनगर भिमाशंकर Bhimashankar महामार्गावर नागरिकांची प्रचंड गर्दी पहायला मिळत आहे. Citizens trampled rules on second day of curfew in North Pune district

पुणे जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार पोलीस Police प्रशासनाकडुन संचारबंदीच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी ठिकठिकाणी चेक नाके उभे केले आहेत. आणि नियमभंग करणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. मात्र अत्यावश्यक सेवेची कारणे दाखवत नागरिक रस्त्यावर सर्रास फिरताना दिसत आहेत हे विदारक चित्र पुढील काळात कोरोनाचा समुह संसर्ग वाढवण्यासाठी भर देईल हेच या निमित्ताने म्हणावं लागेल..

Edited By- Sanika Gade.


संबंधित बातम्या

Saam TV Live