क्लार्क होता, नोकरी सोडली! बाबा बनला आणि कोट्यावधी कमवले

फराह खान
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

हिंदू मान्यतेनुसार कल्कि अवतार भगवान विष्णुचे 10वे अवतार... दुष्टांचा संहार करण्यासाठी ते कलयुगात अवतरल्याचं बोललं जातं.मात्र त्याआधी एक भोंदू बाबा अवतरले. आधी ते लाईफ इंशॉरन्स क्लार्क होते, नंतर कामकाज सोडून, स्वतःच स्वतःला  ‘कल्कि भगवान’ घोषित केलं.ऐक्याच्या तत्वांचा संदर्भ देत 1980 साली त्यांनी एक संस्था सुरु केली. नंतर या संस्थेचा विस्तार केला. हा विस्तार एवढा विस्तारित झाला की  इनकम टैक्स डिपार्टमेंटलाच कल्कि भगवान’कडे जावं लागलं.

40 ठिकाणी छापा
‘कल्कि भगवान’ची संस्था आपली कमाई लपवत असल्याची सूचना इनकम टैक्स डिपार्टमेंटला मिळाली. मग काय इनकम टैक्स डिपार्टमेंटची टीम दर्शनासाठी पोहोचली. 16 ऑक्टोबरला आंध्र प्रदेश, कर्नाटक, आणि तमिळनाडूमधील 40 ठिकाणी छापा टाकला. तिथं जे सापडलं ते पाहून छापा टाकण्यासाठी गेलेल्या टीमचेही डोळे विस्फारले. या संस्थेच्या खात्यात अनियमितता तर होतीच, शिवाय बेहिशेबी संपत्तीचं घाबाडही होतं.मीडिया रिपोर्ट्सनुसार आयकर विभागने इथून 18 कोटी रुपयांचे अमेरिकी डॉलर, 88 किलो सोन्याचे दागिने, ज्याची किंमत 26 कोटी आहे,1271 कॅरेटचा हिरा, ज्याचं मुल्य 5 कोटींच्या घरात आहे. जप्त केले. ‘कल्कि भगवान’कडे सापडलेली एकूण संपत्ती 500 कोटींपेक्षाही जास्त आहे. 

स्वतःला ‘कल्कि भगवान’म्हणवून घेण्याऱ्या या व्यक्तीचं नाव विजय कुमार आहे. वय 70 वर्ष..आपल्या फॉलोअर्सला तो भगवान विष्णुचा 10वा अवतार सांगतो.. 1980 साली त्याने जीवाश्रम नावाची संस्था उभारली..आणि लोकांना वैकल्पिक शिक्षण देण्याचं काम सुरु केलं. विजय कुमार, त्याची पत्नी आणि त्याचा मुलगा एनकेवी कृष्णा हे आश्रम चालवतात.
या संस्थेचा कारभार फक्त भरतातच नाही तर परदेशातही असल्याची बाब तपासात उघड झालीय.या संस्थेनं परदेशात पैसा गुंतवलाय. त्याशिवाय आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये जमीनीची खरेदी केलीय.बरेच परदेशी धन-दांडगेही या संस्थेशी जोडलेले आहेत...

WebTittle:Clark was, quit his job! Become a dad and earn billions

संबंधित बातम्या

Saam TV Live