मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात रात्री चर्चा

साम टीव्ही
मंगळवार, 28 एप्रिल 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात रात्रीच्या दरम्यान महापौर बंगल्यावर चर्चा झाली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात रात्रीच्या दरम्यान महापौर बंगल्यावर चर्चा झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरातही उपस्थित होते.कोरोनाच्या मुकाबल्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला.

लॉकडाऊन संदर्भात राज्यांनी आपल्या पातळीवर निर्णय घ्यावेत असं पंतप्रधानांनी म्हटलंय..या पार्श्वभूमीवर ३ मे नंतर काय निर्णय घ्यायचा याबाबत यावेळी चर्चा झाल्याचं समजतंय. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीसंदर्भातील घडामोडींना वेग आलाय. मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्या बैठकीपूर्वी काहीच वेळ आधी अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मंत्रीमंडळानं एकमतानं घेतलेल्या निर्णयाचं राज्यपालांना स्मरण करुन देण्यात आलं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा आमदारकीचा मार्ग सुकर होणार असल्याची चर्चा रंगलीय. 


संबंधित बातम्या

Saam TV Live