मुख्यमंत्री फडवणवीस यांच्यावर सुप्रीम कोर्टात खटला

मुख्यमंत्री फडवणवीस यांच्यावर सुप्रीम कोर्टात खटला

नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस यांच्यावर सुप्रीम कोर्टात खटला चालवण्यात येणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात माहिती लपविल्याप्रकरणी फडणवीस यांच्यावर खटला चालवण्यात येणार आहे.
पडळकरजी 'त्या' बिरोबाच्या शपथेचं काय झालं?
काय आहे प्रकरण?
महाराष्ट्रात 2014मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात माहिती लपवण्यात आल्याचा आरोप आहे. फडवणीस यांच्यावर दोन गुन्हे दाखल असून, ती प्रकरणी न्यायप्रविष्ठ असल्याची माहिती फडवणीस यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात दिलेली नव्हती. याप्रकरणी ज्येष्ठ वकील सतीश उके यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. हायकोर्टाने ती फेटाळून लावल्यानंतर त्यांनी पुढे सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. सरन्यायाधीश रंन गोगोई यांच्या खंडपीठाने मुख्यमंत्री फडणवीस यांच्याविरोधात खटला चालणार असल्याचे स्पष्ट केले आहे. याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांना नोटीस बजावली होती. तसेच या विषयावर बाजू मांडण्यास सांगितले. होते. त्यावर योग्य वळी उत्तर सादर केले जाईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री सचिवालयातून माध्यमांना देण्यात आली होती. फडणवीस यांच्या विरोधातील याचिका तथ्यहीन असल्याचे मुंबई हायकोर्टाने म्हटले होते.
उदयनराजेंविरोधात अखेर उमेदवार ठरला!
कायदा काय सांगतो?
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याविरोधात लोकप्रतिनिधी कायद्याचा भंग केल्याची तक्रार याचिकेत करण्यात आली आहे. हायकोर्टाने याचिका फेटाळल्यानंतर गेल्या वर्षी याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. कायद्यातील तरतुदीनुसार जर, मुख्यमंत्री फडणवीस दोषी आढळले तर, त्यांना दोन वर्षांची कारावासाची शिक्षा होऊ शकते.
Web Title: cm devendra fadnavis to face trial in sc for 2014 affidavit case Vidhan Sabha 2019

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com