48 जागांसाठी आम्ही तयार; मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला इशारा

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 9 फेब्रुवारी 2019

पुणे : भाजप आणि शिवसेना यांच्यातील युतीबाबत अद्याप संभ्रम असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही 48 जागांवर लढण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी एकप्रकारे शिवसेनेला इशाराच दिला आहे. 'पंतप्रधान मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रच आघाडीवर असेल. पुणे जिल्ह्यातील लोकसभेच्या तिन्ही जागा जिंकायचया आहेत', असे फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना म्हटले, की पुन्हा काँग्रेसचा उमेदवार निवडून आल्यास मोठी चूक असेल. गेल्यावेळी आपले 42 खासदार निवडून आले. येत्या निवडणुकीत 43 खासदार ही निवडून येईल आणि तो बारामतीतून असेल. काँग्रेसच्या काळात मनमोहनसिंह यांचे सरकार केवळ दिवस ढकलत होते. कोणतेच काम करत नव्हते, कोणतेही निर्णय घेत नव्हते. मात्र पंतप्रधान मोदी एकही दिवस गप्प न राहता काम करीत आहेत. मोदींनी 21 वे शतक देशाच्या नावे केले आहे. कार्यकर्त्यांनी बूथ पातळीवर काम करावे. ज्यामुळे निवडणुका जिंकणे सोपे होईल. सरकारचे काम लोकांपर्यंत पोचवा.

शक्ती केंद्र संमेलन आणि पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी भाजपचे अध्यक्ष अमित शहा आज (शनिवार) पुणे दौऱ्यावर आहेत. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी युतीबाबत आणि पुणे, बारामती आणि शिरूर या मतदार संघांबाबत आढावा घेतला. 

Web Title: CM Devendra Fadnavis says BJP is ready to contest all 48 seats

संबंधित बातम्या

Saam TV Live