BIG BREAKING | जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सोडली तर सगळं बंद करणार

वैदेही काणेकर
शुक्रवार, 20 मार्च 2020

खासगी कार्यालयं अजुनही सुरु आहेत. मात्र ही कार्यालयंही बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे पगारही कापण्यात येऊ नये, अशाही सूचना करण्यात आल्या आहेत.

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज लोकांना संबोधित केलं. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लोकल, बससेवा बंद करणार नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र त्याव्यतिरीक्त त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण आदेश दिलेत. 

जीवनावश्यक वस्तूंची दुकानं वगळता, सर्व काही बंद करावं, असे आदेश देण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग पसरु नये, यासाठी काही कडक निर्णय घेत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे. मातोश्रीवरुन करण्यात आलेल्या या व्हिडीओ कॉन्फरन्सिगच्या वेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि महाराष्ट्राचे सचिवही सोबत होते. येणारे 15 दिवस अत्यंत महत्त्वाचे असल्याने प्रत्येकाने काळजी घेण्याचं आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. 

खासगी कार्यालयं अजुनही सुरु आहेत. मात्र ही कार्यालयंही बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे पगारही कापण्यात येऊ नये, अशाही सूचना करण्यात आल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे सरकारी कार्यालयांत 25 टक्के कर्मचा-यांसोबत काम चालू ठेवण्यात येणार आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यातील महत्त्वाचे मुद्दे - 

  • सर्वत्र एकाच खबरदारीचा उपाय सांगितला जात आहे म्हणजे घरातच राहा. मी काल या लढ्याला युद्धाची उपमा दिली आहे. 
  • जगण्यासाठी आपल्याला घरात थांबण्याची वेळ आली आहे. अनेकांनी मदतीला सुरुवात केली आहे. दिग्गजांनी आपले काम थांबवून यामध्ये आम्हाला मदत केली आहे. 
  • चित्रपटसृष्टीतले, क्रीडा क्षेत्रातले सर्वच पुढे आले आहेत. काल मी आवाहन केले होते, त्याला प्रतिसाद मिळतोय . 
  • पुढचे १५ -२० दिवस अत्यंत महत्वाचे आहे. संसर्ग टाळणे महत्वाचे आहे.काही गोष्टी आपल्या काळजीसाठी घेत आहोत. आपले सहकार्य असू द्या. 
  • अनेकांनी सल्ले दिले आहेत की बसेस, रेल्वे बंद करा. पण अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या लोकांची ने आण कशी करणार ?  मनपा कर्मचारी, वाहनचालक काय करणार?
  • तूर्त या सेवा बंद न करता सरकारी कार्यालयांत 25 टक्के कर्मचारीच कामावर बोलावणार. यापूर्वी ५० टक्के कर्मचाऱ्यांचा निर्णय घेतला होता.
  • बँका सुरूच राहतील.   
  • खास करून मुंबई, पुणे-पिंपरी चिंचवड, नागपूर या मोठ्या शहरांत सर्व कार्यालये, दुकाने बंद होतील. यातून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळण्यात आली आहे. यात अन्नधान्य, दुध, औषधी यांचा समावेश आहे. 
  • या शहरांमध्ये कुणाला काही संभ्रम असेल तर संबंधित जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्याशी बोलू शकतात.
  • ज्या आस्थापना, दुकाने बंद करतो आहात त्यांना माझे आवाहन आहे की आपला जो कष्टकरी कर्मचारी वर्ग आहे त्यांना किमान वेतन देणे बंद करू नका.

 

 

पाहा व्हिडीओ - TWEET

 

 

 

 

cmo uddhav thackarey on city shut down mumbai marathi rajesh tope corona virus covid 19 maharashtra

 


संबंधित बातम्या

Saam TV Live