घरी गप्प बसा! महाराष्ट्रात संचारबंदी लागू, जिल्ह्यांच्या सीमादेखील बंद

UDDHAV CURFEW
UDDHAV CURFEW

मुंबई - अखेर राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलीय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही कठोर निर्णय घ्यावे लागतील असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सर्वांना घरातच राहण्याची सूचना केलीय. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. शिवाय वाहनांनादेखील कडक नियम लागू करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा आणि जीवनाश्यवक वस्तूंची दुकानं वगळता सर्व काही बंद करण्यात आलंय.

मुख्यमंत्र्यांचे मोठे निर्णय
1 राज्यात संचारबंदी लागू
2 सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद
3 खासगी वाहनांना बंदी
4 राज्यातील सर्व प्रार्थनास्थळं बंद
5 अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार
6 जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरू राहणार
7 शेतीपयोगी वस्तूंची दुकानं सुरू राहणार
8 कुणीही घराबाहेर पडू नये
9 घराबाहेर पडल्यास नाईलाजाने कारवाई करावी लागेल
10 लोकांना सोशल डिस्टन्सिंगच्या सूचना पाळाव्यात

राज्यात संचारबंदी लागू करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. त्यामुळे आता नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आलाय. संचारबंदी म्हणजे नेमकं काय?

संचारबंदी म्हणजे नेमकं काय?

संचारबंदी लागू झाल्यास नागरिकांना घराबाहेर पडण्यावर कडक निर्बंध लावण्यात येतात.


संचारबंदी ही त्या-त्या क्षेत्रात जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्त लागू करतात.


संचारबंदीच्या काळात पोलीस अधिकाऱ्यांच्या किंवा दंडाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय सार्वजनिक रस्त्यावर किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी, नागरिकांना येता येत नाही. 

जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी काही काळासाठी संचारबंदी शिथील करता येते.

संचारबंदीच्या काळात सण- समारंभ, आंदोलनं,आणि सार्वजनिक कार्यक्रम करण्यास मज्जाव असतो.

सामाजिक तणाव, युद्धजन्य परिस्थिती आणि साथरोगाच्या नियंत्रणासाठी संचारबंदी लागू केली जाते.

आजपासून जमावबंदी करण्यात आली होती. लोकल, बेस्ट बस, एसटी सेवा बंद आहे, मात्र अशातही अनेकजण आज सकाळीच कामावर जायचं म्हणून बाहेर पडल्याचं चित्र पाहायला मिळालं. कालच्या तुलनेत आज वाहनांची संख्याही रस्त्यांवर जास्त असल्याचं दिसलं. त्यामुळे सरकारने केलेल्या आवाहनाला लोकांकडून हरताळ फासल्याचं अधोरेखित झालं.


दादर प्लाझा परिसरात सकाळपासून नागरिकांची गर्दी पहायला मिळाली. भाजी खरेदीसाठी याठिकाणी नागरिकांची धावपळ सुरू होती. तर दुसरीकडे खासगी वाहनांमधून प्रवास करणाऱ्यांची तितकीत गर्दी होती. मुलुंड टोलनाक्यावर वाहनांची तुफान गर्दी झाल्याचं पहायला मिळालं. सर्वत्र लॉकडाऊन असताना ठाणे आणि मुंबईला जोडणाऱ्या आनंद नगर चेकनाका इथे खाजगी वाहनांच्या रांगा लागल्या. त्यामुळे टोलनाक्यावर वाहतूक कोंडी झाली. मुंबईच नव्हे तर पुणे, नाशिक, नागपूर आणि औरंगाबाद या सर्वच ठिकाणी लोकं घरातून बाहेर पडल्यानं चिंता व्यक्त केली जात होती.

cm uddhav thackeray announces curfew across maharashtra to fight for corona 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com