योगी-पंतप्रधान भेटीनंतर उत्तर प्रदेशच्या मंत्र्यांच्या पोटात गोळा

yogi aditynath.jpg
yogi aditynath.jpg

नवी दिल्ली : पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या  2022 Assembly elections पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे UttarPradesh  मुख्यमंत्री  योगी आदित्यनाथ Chief Minister Yogi Adityanath यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.  योगी आदित्यनाथ हे दोन दिवसांचा दिल्ली दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष  जे. पी. नड्डा J. P. Nadda  आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा Amit Shah यांचीही भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ  दोन दिवसांच्या दिल्ली दौर्‍यावर आहेत. या भेटीनंतर  २०२२ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात भाजपाचे सरकार लवकरच मंत्रिमंडळात फेरबदल करणार  असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यांच्या या दौऱ्यामुळे  उत्तरप्रदेशातील राजकीय वर्तुळात चर्चेला  उधाण आले आहे.  (UP CM Yogi Adityanath meets PM Narendra Modi ahead of election) 

दरम्यान,  पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, कोविड -19 ची परिस्थिती हाताळण्यासंदर्भात पंचायत निवडणुकांचा निकाल आणि काही भागातील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या नेत्यांकडून अभिप्राय घेऊन राज्यात पक्ष मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे.  राज्यातील नेते आणि मंत्र्यांकडून मिळालेल्या अभिप्रायावर आधारित रणनीती तयार करणे, याशिवाय  राज्य सरकारची प्रतिमा मजबूत करण्यासाठी आणि राज्यातील समस्या सोडविण्याचा निर्णयही पक्षाने घेतला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका 2022  मध्ये होणार आहेत. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने 300  हून अधिक जागांवर विजय मिळविला. 403 सदस्य असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभेमध्ये प्रमुख पक्षांमध्ये भाजपाचे 309, समाजवादी पार्टीचे 49, बहुजन समाजवादी पक्षाचे 18 आणि कॉंग्रेसचे 7 सदस्य आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री योगी यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांचीदेखील त्यांच्या निवासस्थानी  भेट घेतली. तथापी, जेपी नड्डा यांची भेट घेतल्यानंतर सीएम योगी यांनी ट्वीट करून त्यांचे अभारही मानले आहेत.  नवी दिल्ली येथे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. जे.पी. माझ्या व्यस्त दिनदर्शिकेतून मला वेळ दिल्याबद्दल आदरणीय अध्यक्ष जी यांचे आभार, अशा शब्दात त्यांचे आभार मानले आहेत.  तर पंतप्रधानांना भेटण्यापूर्वीच त्यांनी काल गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट झाली होती. या दोन्ही नेत्यांच्या बैठकीनंतर जे. पी.  नड्डा यांनी पंतप्रधानांची भेट  घेतली.  विधानसभा निवडणुकीपूर्वी उत्तर प्रदेश सरकार आणि संघटनेत काही बदल होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे.  त्या संदर्भात या बैठका सुरू आहेत.

Edited By - Anuradha Dhawade 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com