कर्नाळा बँक घोटाळा : रामशेठ ठाकूर, विवेक पाटील यांच्यासह सर्व संचालकांच्या मालमत्ता जप्तीचे आदेश

Karnala Bank Directors in Problem
Karnala Bank Directors in Problem

पनवेल : कर्नाळा बँकेतील (Karnala Bank) 526 कोटीच्या घोटाळ्यात निवाड्यापूर्वीच्या मालमत्ता जप्तीचे आदेश बजावून प्रारंभीपासूनच्या सर्व संचालकांसह, मयत संचालकांचे वारस, बँक (Bank) अधिकाऱ्यांच्या मालमत्तेवर सहकार खात्याने टाच आणली आहे. Co operative Department issued Forfeiture notices in Karnala Bank Scam 

बँकेचे चेअरमन शेकापचे (PWP) माजी आमदार विवेक पाटील (Vivek Patil) यांच्यासह भाजपाचे (BJP) स्थानिक नेते, माजी खासदार रामशेठ ठाकूर, विधान परिषद सदस्य आ. बाळाराम पाटील, उद्योजक जे. एम. म्हात्रे, अभिजित पाटील आदींचा मालमत्ता जप्तीच्या नोटीस यादीत समावेश आहे.

जाधववर यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 95 अन्वये निवाड्यापूर्वीचा किंवा आदेशापूर्वीचा जप्तीचा आदेश का पारित करण्यात येवू नये, अशा आशयाची कारणे दाखवा नोटीस बजावल्याने सर्व संचालक, मयतांचे वारस, बँक अधिकारी यांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई अटळ ठरली आहे. याकरिता 3 मे रोजी सुनावणी ठेवण्यात आल्याचे जाधववर यांनी नोटीसमध्ये अधोरेखित केले आहे. 

प्राधिकृत अधिकारी तथा ठाणे (Thane) जिल्हा उपनिबंधक विशाल जाधववर यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कर्नाळा नागरी सहकारी बँकेत 526 कोटीचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पनवेल (Panvel) शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (CID)  पुणे येथील आर्थिक शाखेकडे तपासकामी वर्ग करण्यात आला आहे. Co operative Department issued Forfeiture notices in Karnala Bank Scam 

त्याशिवाय सहकार खात्याने (Co-operative Department) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 88 अन्वये 18 जूनच्या आदेशानुसार बँकेतील आर्थिक नुकसानीच्या रक्कमेची जबाबदारी निश्चित करण्यासाठी तसेच आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्यासाठी सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी ठाणे शहर उपनिबंधक विशाल जाधववर यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.जाधववर यांनी बँकच्या स्थापनेपासूनचे सर्व संचालक, मयत संचालकांचे वारस आणि बँक अधिकारी अशा 39 जणांची 25 नोव्हेंबरला दोषारोप ठेवण्यासाठी आणि त्यांची बाजू मांडण्यासाठी संधी दिली होती.

दोषींवर कारवाई करून संचालकांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश काढून ठेवीदारांना त्यांचे पैसे परत करावेत, ही प्रमुख मागणी घेवून कांतीलाल कडू आणि सहकारी पायाला चक्री बांधून सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांचे उंबरठे ओलांडत आहेत. त्यांच्या त्या प्रामाणिक प्रयत्नांना अंशत: यश आले आहे. विशाल जाधववर यांनी 5 एप्रिलला 38 जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. संचालक रजनीकांत नटवरलाल शाह यांचे निधन झाल्याने आणि त्यांचे कुणीही वारस नसल्याने त्यांना वगळण्यात आले आहे. 

Edited By - Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com