बुलढाण्यात १ देशी पिस्तूल, शस्त्रासाठ्यासह नकली नाणी जप्त

संजय जाधव
बुधवार, 12 मे 2021

सोन्याची नकली नाणी कमी किंमतीत देण्याचे आमिष देऊन सौदा ठरविणाऱ्या आणि सौद्यानंतर ग्राहकांना मारहाण करणाऱ्या टोळीला मागील आठवड्यात बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव विभागीय पोलिसांनी अटक केली होती. त्याआधारे आज बुधवारी पहाटे पुन्हा तालुक्यातील आंत्रज, हिवरखेड़, रोहना, कंझारा या गावपरिसरातील  जंगल परीसरात पोलिसांनी पुन्हा कोबिंग ऑपरेशन राबविले.

बुलढाणा: सोन्याची नकली नाणी कमी किंमतीत देण्याचे आमिष देऊन सौदा ठरविणाऱ्या आणि सौद्यानंतर ग्राहकांना मारहाण करणाऱ्या टोळीला मागील आठवड्यात बुलढाणा Buldhana जिल्ह्यातील खामगाव Khamgaon विभागीय पोलिसांनी Police अटक केली होती. या आरोपींची चौकशी केली असता आणखी धागेदोरे हाती लागले.  त्याआधारे आज बुधवारी पहाटे पुन्हा तालुक्यातील आंत्रज, हिवरखेड़, रोहना, कंझारा या गावपरिसरातील  जंगल परीसरात पोलिसांनी पुन्हा कोबिंग ऑपरेशन राबविले. Cobbing operation by Buldhana police

यात दोन अट्टल गुन्हेगार पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडून एक देशी पिस्तूल, नकली सोन्याच्या गिन्या, मोबाईल, तलवारी आणि मोठा शस्त्र साठा जप्त करण्यात आला आहे. २० अधिकारी, दोन आरसीबी पथक, ५० अंमलदार असा मोठा ताफा घेवून ही कारवाई करण्यात आली.

हे देखील पहा -

दरम्यन पोलीस कोठडीत Jail असलेल्या या आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार आज पहाटे अंत्रज, हिवरखेड, रोहणा, कंझारा या भागातील जंगलात कोबिंग ऑपरेशन Cobbing operation राबविण्यात आले. यात आणखी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर आधी सुद्धा गुन्हे दाखल आहेत.

धुळ्यात चार महिन्यांपूर्वी घरफोडी करणारा चोरटा अखेर जेरबंद  

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून एक देशी पिस्तुल तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा, मोबाईल, नकली सोने चांदी असा  3 लाखांवर मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live