मध्यरात्री पोलीस स्टेशन मध्ये आला नाग आणि...

अभिजीत घोरमारे
गुरुवार, 20 मे 2021

भंडारा जिल्ह्याच्या लाखनी पोलिस स्टेशन मध्ये मध्यरात्रीच्या सुमारास नागाने ठाण मांडल्याने पोलिसांची एकच धावपळ झाली. अखेर मध्यरात्री ग्रीनफ्रेंड नेचरच्या टीमला पाचारण करत नागाचे रेस्क्यू ऑपरेशन करत त्याला जीवनदान देण्यात आले आहे. 

भंडारा - तो पोलिस Police  स्टेशन Station मध्ये दाखल झाला आणि पोलिसांची भंभेरी उडाली ! भंडारा जिल्ह्याच्या लाखनी पोलिस स्टेशन मध्ये मध्यरात्री सुमारास नागाने Cobra ठाण मांडल्याने पोलिसांची एकच धावपळ झाली. अखेर मध्यरात्री ग्रीनफ्रेंड नेचरच्या टीम ला पाचारण करत नागाचे रेस्क्यू Rescue ऑपरेशन करत त्याला जीवनदान देण्यात आले आहे. Cobra Arrived In Police Station At Midnight

लाखनी पोलिस स्टेशन मध्ये कमांडो फोर्स दलाच्या कार्यालयात एका बेडजवळ नाग फणा काढून बसला असल्याची माहिती लाखनी पोलिसांनी रात्री 2 वाजता ग्रीनफ्रेंड नेचरच्या टीमला दिली.

हे देखील पहा -

लाखनी पोलिस स्टेशन मध्ये कमांडो फोर्स दलाच्या कार्यालयात एका बेडजवळ नाग फणा काढून बसला असल्याची माहिती लाखनी पोलिसांनी रात्री 2 वाजता ग्रीनफ्रेंड नेचरच्या टीमला दिली.Cobra Arrived In Police Station At Midnight

कराडमध्ये बोगस महिला डॉक्टर करत होती कोरोना रुग्णांवर उपचार

ताबडतोब ग्रीनफ्रेंड नेचरचा सदस्य व निसर्गमित्र पंकज भिवगडेने पोलिस स्टेशन गाठले. अवघ्या 15 मिनिटांत नागाला बरणीमध्ये बंद करत त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. विषारी नाग बरनीत बंद झाल्यावर रात्रपाळीतील पोलिस कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वा:स सोडला. 

Edited By : Krushnarav Sathe 


संबंधित बातम्या

Saam TV Live