कोकणात या  पण इतके दिवस विलग रहा !

कोकणात या  पण इतके दिवस विलग रहा !

सिंधुदुर्गातील मुंबईत स्थायिक झालेली अनेक कुटुंबे एप्रिल-मेमध्ये आंब्या-फणसाच्या दिवसात आपल्या मूळ गावी येतात. पण, यावर्षी मात्र त्यांची गावाकडची वाट सोपी राहिलेली नाही. राज्य सरकारने परराज्यात अडकलेले भाविक, मजूर आणि कामगार यांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. परजिल्ह्यात अडकलेल्यांसाठीसुद्धा अशा पद्धतीची सोय करण्यात आली आहे. मात्र, गावात आल्यावर त्यांना विलग रहावे लागणार असल्याने अडचण होणार आहे. 
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण आणि संगमेश्वर येथे दोन करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. दोन्ही रुग्ण मुंबई आणि ठाणे येथून रत्नागिरीत आले होते. जरी तुम्ही कोकणात जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला 28 दिवस  वेगळ राहावं लागेल. 
 
पुण्या-मुंबईहून म्हणजेच रेड झोनमधून रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये जाऊ इच्छिणाऱ्यांचा मुक्काम अवघड होण्याची चिन्हे आहेत. रेड झोनमधून जाणाऱ्या नागरिकांना १४ दिवस संस्थात्मक अलगीकरण आणि १४ दिवस गृह विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. तसे आदेश सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जारी केले आहेत. गावपातळीवर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून या समितीने गावपातळीवर कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या आहेत.
 

WebTittle :: Come to Konkan but stay away for so many days!

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com