दिलासादायक! कुष्ठरोग्यांच्या र्औषधाने होईल कोविड -19 शी फाईट करण्यास मदत

सिद्धी चासकर.
शुक्रवार, 19 मार्च 2021

आणखी एक औषध कोरोना विषाणूवर प्रतीकार करणारं आणि गंभीर संसर्गावरही प्रतीकार करणार आहे. ते म्हणजे कुष्ठरोगांसाठी वापरली जाणारी र्औषध हे कोविड-19 विरूद्ध लढायला मदत करू शकते.

कोरोना व्हायरस जग भर पसरला असल्याने सगळीकडे भीतीचं वातावरण निर्माण झालयं, यावर लस ही आली मात्र लसीकरणावर अजुन प्रश्नचिन्हं आहे. तज्ञ अजून ही लसीकरणावर काम करत आहेत. अँटी-व्हायरल ड्रग रेमडेसिविरआर्थराइटिस ड्रग टोसिलिझुमब, अँटी-मलेरियल ड्रग हायड्रोक्लोरोक्वीन कोविड -19 साठी या औषधांचा रूग्णांच्या उपचारांमध्ये समाविष्ट केला गेला आहे. मात्र आणखी एक औषध कोरोना विषाणूवर प्रतीकार करणारं आणि गंभीर संसर्गावरही प्रतीकार करणार आहे. ते म्हणजे कुष्ठरोगांसाठी वापरली जाणारी र्औषध हे कोविड -19 विरूद्ध लढायला मदत करू शकते.

काही शास्त्रज्ञांनी प्रयोगास सुरूवात केली प्रयोगासाठी शास्त्रज्ञांनी कोरोना संक्रमित असलेल्या उंदीरांवर आणि उंदीरांसारख्या प्राण्यांवर क्लोफेगामाइनची चाचणी केली. नेचर या जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की कुष्ठरोगाच्या औषधाने कोरोना व्हायरसविरूद्ध तीव्र अँटी-व्हायरल क्रिया दर्शविली जात आहे, ज्यामुळे कोविड -19 शी फाईट करण्यास याची मदत होईल. आता हा प्रयोग मानवावरही करण्यात येत आहे निकालांच्या आधारे मानवी चाचण्यांचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे.

कोरोना पॉझिटिव्ह लोकांवर क्लोफागालामाइन या औषधांचा वापर केल्याने आजाराचा प्रभाव कमी होऊ शकतो, हे औषध आताच्या घडीला फार महत्वाचं आहे. कारण भारतात व्हायरसचे नवीन रूप समोर येत आहेत आणि त्यात कोरोना विरूद्धच्या लसीचा प्रभाव हा कमी दिसत आहे. संसर्ग होण्यापूर्वी निरोगी प्राण्यांना क्लोफागालामाइन हे औषध देण्यानं फुफ्फुसांचे नुकसान कमी होते आणि सायटोकाईनच्या प्रसारास प्रतिबंध करते त्यामुळे क्लोफागालामाइन हे औषध कोविड --19 विरूद्ध लढायला मदत करू शकते.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live