भटवाडी सरपंच आणि ग्रामस्थांचा स्तुत्य उपक्रम...पर्यावरणपूरक रक्षाविसर्जन आणि पक्षी संवर्धन एकाच वेळी

विजय पाटील
शनिवार, 24 एप्रिल 2021

चिमणी  पाखरांनो  या ....चारा खा,पाणी प्या.  निवांत झाडावर बसून जीवन गाणे गा . अन् भुर्रर्र उडून जा.. असा अभिनय आणि पर्यावरणपूरक उपक्रम स्मशानभूमीत राबवण्यात आला आहे. सांगलीच्या  शिराळा तालुक्यातील भटवाडी सरपंच आणि ग्रामस्थांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. 

 

सांगली - चिमणी Sparrow पाखरांनो Birds या ....चारा खा,पाणी प्या.  निवांत झाडावर बसून जीवन गाणे गा . अन् भुर्रर्र उडून जा.. असा अभिनय आणि पर्यावरण Environment पूरक उपक्रम स्मशानभूमीत राबवण्यात आला आहे. सांगलीच्या Sangli शिराळा तालुक्यातील भटवाडी सरपंच Sarpanch आणि ग्रामस्थांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. Commendable activities of Bhatwadi Sarpanch and villagers

शिराळा Shirala औद्योगिक वसाहती नजीक असणारे भटवाडी Bhattvadi हे एक लहानस,  पण कर्तृत्वाने मोठे असणारे गाव. या गावचे युवा सरपंच विजय महाडिक यांनी लोकसहभागातून गावात अनेक उपक्रम राबविले आहेत. गेल्या दीड वर्षापासून येथील स्मशानभूमीच्या  परिसरात खडकाळ माळरानावर विविध प्रकारची झाडे लावली आहेत.रक्षा विसर्जनाची राख ओढ्यात,शेतात अथवा नदीत न सोडता ती प्रत्येक झाडाला घातली जात आहे.

झाडांना पाणी घालण्यासाठी स्वतंत्र छोटी पाईपलाईन केली आहे.दररोज पाणी घालण्यासाठी एका व्यक्तीची नेमणूक करण्यात आली आहे.  कडक उन्हामुळे झाडांना पाणी कमी पडू नये, म्हणून बुंद्याला मडकी ठेवली आहेत.त्यात दररोज पाणी सोडले जाते. झाडांची चांगल्या प्रकारे वाढ झाल्याने त्या ठिकाणी पक्षांची किलबिलाट सुरू झाली आहे. येणाऱ्या पक्षांना चारा पाणी मिळावा,  म्हणून त्या ठिकाणी दररोज धान्य टाकले जाते.त्यांना पाणी मिळावे, म्हणून मडकी व अंघोळ करण्यासाठी मोठा पाण्याने भरलेला डब्बे येथे ठेवण्यात आला आहे. Commendable activities of Bhatwadi Sarpanch and villagers

प्रत्येक सणाला आणि वर्ष श्राद्धाला नैवेद्य ठेवला जातो.त्यावेळी पक्षासाठी मुबलक खायला मिळते. इतर वेळी त्यांच्या खाण्याची कुचंबना होऊ नये. म्हणून तांदूळ, ज्वारी, गहू असे धान्य त्या ठिकाणी ठेवले जाते.त्यामुळे या परिसरातील पक्षांच्या संख्येत आता वाढ झाली आहे. परंपरेला पर्यावरण संवर्धनाची जोड दिल्याने भटवाडीत एक आदर्शवत काम उभे राहत आहे. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

Edited By - Shivani Tichkule


संबंधित बातम्या

Saam TV Live