सामान्य सर्दीच्या विषाणू ठरतोय कोविड १९ च्या विषाणूला वरचढ

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 एप्रिल 2021

मानवांमध्ये सामान्य सर्दीला कारणीभूत ठरणारा विषाणू कोरोना कोविडचा विषाणू सार्स-सीओव्ही -2 SARC-CoV-2  विरूद्ध प्रभावी ठरतो आहे, असे ब्रिटनच्या ग्लासगो विद्यापीठात झालेल्या नव्या अभ्यासात दिसून आले आहे

लंडन : मानवांमध्ये सामान्य सर्दीला कारणीभूत ठरणारा विषाणू कोरोना कोविडचा विषाणू सार्स-सीओव्ही -2 SARC-CoV-2  विरूद्ध प्रभावी ठरतो आहे, असे ब्रिटनच्या ग्लासगो विद्यापीठात झालेल्या नव्या अभ्यासात दिसून आले आहे. Common cold virus Effective against Covid Virus

जीन-बाप्टिस्ट लॅमार्क Jean-Baptiste Lamarck आणि चार्ल्स डार्विन Charles Darwin यांच्या उत्क्रांतीवादी सिद्धांताची मूळ संकल्पना म्हणजे सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट  Survival of the fittest. विविध प्रजाती अस्तित्वासाठी एकमेकांशी स्पर्धा करतात आणि ज्या दुर्बल असतात त्यांचा नाश होतो असा हा सिद्धांत

त्यानुसार सामान्य सर्दीचा विषाणू रिनोव्हायरस Rhinovirus आहे. तो कोरोना होण्यासाठी कारणीभूत असलेल्या कोविड १९ Covid 19 विषाणूला निष्प्रभ ठरवतो, असे अभ्यासअंती दिसून आले आहे. Common cold virus Effective against Covid Virus

प्रजातींप्रमाणे विषाणूही Virus आपले अस्तित्व टिकून राहण्यासाठी स्पर्धा करतात. मानवी शरीर हे विविध प्रकारचे व्हायरस टिकून राहण्यासाठी त्यांचे एक महत्त्वपूर्ण घर आहे. ग्लासगो विद्यापीठातील वैज्ञानिकांनी त्यांच्या प्रयोगासाठी मानवी श्वसनमार्गाची प्रतिकृती वापरली, त्यांनी या प्रतिकृतीमध्ये मानवी श्वसनमार्गात सार्स-सीओव्ही -2 आणि राइनोव्हायरस सोडले. 

त्यावेळी त्यांना आढळले कि, जर सार्स-सीओव्ही -2 आणि राइनोव्हायरस एकाच वेळी सोडण्यातआले तर, कोरोना व्हायरस सामान्य सर्दीच्या विषाणूच्या प्रभावाखाली निष्प्रभ ठरतो. अशा वेळी श्वसनमार्गाला संसर्गाची लागण फक्त सामान्य सर्दीमुळे होते. त्यामुळे कोविडच्या विषाणूला संसर्ग पसरविण्यासाठी वावच उरत नाही.

Edited By-Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live