शिरुरच्या बुरुंजवाडीत कोरोनाचा समुह संसर्ग?

रोहिदास गाडगे
गुरुवार, 15 एप्रिल 2021

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरू असून पुणे-नगर महामार्गाच्या लगत असलेल्या शिरूर तालुक्यातील १२०० लोकसंख्या असलेल्या बुरुंजवाडी गावात सार्वजनिक कार्यक्रमातुन कोरोनाचा विस्फोट झाला आहे.

शिरुर : पुणे Pune जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा Corona कहर सुरू असून पुणे-नगर महामार्गाच्या लगत असलेल्या शिरूर Shirur तालुक्यातील १२०० लोकसंख्या असलेल्या बुरुंजवाडी गावात सार्वजनिक कार्यक्रमातुन कोरोनाचा विस्फोट झाला आहे. बुरुंजवाडी गावात गेली चार पाच दिवसापासून झपाट्याने रुग्ण वाढ होत असून गावात सध्या १०० पेक्षा जास्त बाधित रुग्ण असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. Community Spread in Pune Shirur Taluka Village

पुण्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा समुह संसर्ग Community Spread वाढत असल्याने पुणे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख Rajesh Deshmukh यांनी जत्रा यात्रा सार्वजनिक कार्यक्रम,लग्न सभारंभावर बंदी लावण्यात आली असताना शिरुर तालुक्यातील बुरुंजवाडी गावात शासकीय नियम पायदळी करत सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. याच कार्यक्रमादरम्यान गावातील नागरिक,महिला तरुणवर्ग,वयोवृद्ध सर्वजण एकत्र आले होते याच दरम्यान कोरोनाचा समुह संसर्ग झाला आहे. 

१२०० लोकसंख्या असलेल्या गावात कोरोनाचा Corona संसर्ग आणि मृत्युचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन शिरुर प्रशासन खडबडुन जागे झाले असुन संपुर्ण गावात आता अँटिजन टेस्ट करुन लक्षणे आढळल्यास तात्काळ कोरोना चाचणी करुन त्या व्यक्तीला कोविड सेंटरला पाठवले जात आहे. Community Spread in Pune Shirur Taluka Village

बुरुंजवाडी हे गाव रांजणगाव औद्योगीक वसाहत Ranjangao MIDC परिसरातील गाव असल्याने गावातुन कामानिमित्र बाहेर जाणा-या व्यक्तीकडून कोरोनाचा प्रसार झाल्याचाही अंदाज व्यक्त केला जात आहे. कोरोनाचा समुह संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून कडक निर्बंध लावण्यात येतात. मात्र प्रशासनाच्या आदेशाची उत्तर पुणे जिल्ह्यातील अनेक पायमल्ली केली जाते. त्याचाच परिणाम म्हणुन कोरोनाचा वाढता संसर्ग आहे
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live