महागड्या कार बनवणारी कंपनी आता बनवतेय मध

साम टीव्ही न्यूज
शनिवार, 2 मे 2020

जगभरात करोनाने धुमाकूळ घातला आहे. करोना व्हायरसमुळे अनेक देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे इंडस्ट्री ठप्प आहे. कोट्यवधी रुपयांची कार बनवणारी कंपनी रोल्स रॉयस ने आपला ट्रॅक सध्या बदलला आहे.

 

नवी दिल्लीः जगभरात करोनाने धुमाकूळ घातला आहे. करोना व्हायरसमुळे अनेक देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे इंडस्ट्री ठप्प आहे. कोट्यवधी रुपयांची कार बनवणारी कंपनी रोल्स रॉयस ने आपला ट्रॅक सध्या बदलला आहे. करोनामुळे ऑटो इंडस्ट्री ठप्प झाली आहे. त्यामुळे रॉल्स रॉयस कंपनीने मध बनवणे सुरू केले आहे.

लॉकडाऊन सुरू असल्याने इंडस्ट्री ठप्प झाल्याने अनेक कंपन्यांनी आपला मार्ग थोडा बदलला आहे. अनेक कंपन्या नवीन उत्पादने बनवत आहे. ज्याचा करोना संकटात लोकांना फायदा होईल. काही कंपन्यांनी मास्कचे उत्पादन बनवणे सुरू केले तर काही दारू कंपन्या सॅनिटायझर बनवत आहेत.

जगातील सर्वात खास मध
ब्रिटीश कार कंपनी रॉल्स रॉयस ने एक वेगळेपण निवडले आहे. लग्झरी कार बनवणारी कंपनी अशी ओळख असताना या कंपनीने मध बनवणे सुरू केले आहे. कंपनी या मधाला जगातील सर्वात खास मध आहे, असे म्हणत आहे.

ब्रिटनच्या मधमाशांचे संरक्षण
रॉल्स रॉयसचे कर्मचारी गुडवूड, ब्रिटनमध्ये कंपनीच्या ४२ एकरच्या प्लांटमध्ये मध बनवण्याचे काम करीत आहेत. या ४२ एकरमध्ये कंपनीने मधमाशा पाळल्या आहेत. ब्रिटनमध्ये मधमाशांचे संरक्षण व्हावे या हेतूने हे सर्व करण्यात येत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

शेतकऱ्यांची मदत
रॉल्स रॉयसच्या नवीन मार्गामुळे शेतकरी आणि जमीन मालकांना मदत मिळत आहे. या प्लावर लाइनमुळे मधमाशांना मदत मिळेल, असे कंपनीने म्हटले आहे.

 

WebTittle ::  The company that makes expensive cars now makes honey


संबंधित बातम्या

Saam TV Live