खुशखबर ! कंपनी करात कपात

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

निर्मला सीतारामन यांनी कॉर्पोरेट सेक्टरला दिलासा देणारी घोषणा केली. कंपनी करात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्या या निर्णयाचं शेअर बाजाराकडूनही स्वागत करण्यात आलं. या नंतर शेअर बाजाराचा निर्देशांक 900 अंकांनी उसळल्याचं पहायला मिळालं. उद्योग क्षेत्राला उभारणी देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कपातीनंतर कंपन्यांना आता 25.17 टक्के कर द्यावा लागणार आहे.

यापूर्वी अर्थसंकल्पात कंपनी कराची किमान मात्रा असलेल्या 25 टक्के कर टप्प्यात आणखी काही कंपन्या समाविष्ट करण्यात आल्या होत्या. यानुसार आता देशभरातील तब्बल 99.3टक्के कंपन्या किमान अशा 25 टक्के कंपनी कर टप्प्यात येणार असून अवघ्या 0.7 टक्के कंपन्या या सर्वोच्च अशा 30 टक्के करांमध्ये कायम राहणार असल्याचे म्हटले होते. त्यापूर्वी 250 कोटी रुपये वार्षिक उलाढाल असलेल्या आस्थापनांना 25 टक्के कर लागू होती. त्यानंतर ही करमात्रा वाढवून वार्षिक 400 कोटी उलाढाल असणाऱ्यांनाही लागू होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती.

Web Title: Company tax deduction
 
संबंधित बातम्या

Saam TV Live