#CoronavirusLockdown | संपर्ण देश लॉकडाऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा

ब्युरो रिपोर्ट
मंगळवार, 24 मार्च 2020

देशाला संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी जनतेचे आभारदेखील मानले. जनता कर्फ्यू यशस्वी केल्याबद्दल त्यांनी संपूर्ण देशवासियांचे आभार मानले आहेत. मात्र आता यापुढे येणारे 21 दिवस महत्त्वपूर्ण असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. 

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्रम मोदी यांनी संपूर्ण भारतात लॉकडाऊन करत असल्याची मोठी घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली आहे. आज मध्यरात्रीपासून हा या घोषणेची अंमलबजावणी करण्यात आील आहे. येणारे 21 दिवस संपू्रण देशात पूर्णपणे लॉकडाऊन असेल. कुणालाही घराबाहेर पडता येणार नाही आहे. 

 

जर येणा-या 21 दिवसांत आपण लॉकडाऊन यशस्वीरीत्या पाळू शकलो नाही, तर देशातील अनेक कुटुंब उद्ध्वस्त होती, यात शंका नाही, असा इशारा नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. 

 

यावेळी देशाला संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी जनतेचे आभारदेखील मानले. जनता कर्फ्यू यशस्वी केल्याबद्दल त्यांनी संपूर्ण देशवासियांचे आभार मानले आहेत. मात्र आता यापुढे येणारे 21 दिवस महत्त्वपूर्ण असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. 

 

याधी 30 हून अधिक राज्यात लॉकडाऊन करण्यात आलं होतं. 31 मार्चपर्यंत हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता 14 एप्रिलपर्यंत संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. प्रगत देशांना अपयश येताना आपण पाहतोय. अशात आता सोशल डिस्टन्सिंगची नितांत गरज आहे. त्यामुळे घराबाहेरर न पडण्याचा एकच पर्याय सध्या समोर आहे. त्यामुळे पूर्णपणे देश लॉकडाऊन करण्यात आलेलं आहे. आता सगळ्या सूचनांचं पालन प्रत्येकाने काटोकरपणे करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. 

 

 

complete lockdown in india modi announces to nation to gight for covid 19


संबंधित बातम्या

Saam TV Live